‘या’ पद्धतीने होणार दीपिका-रणवीरचा विवाह 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – दीपिका आणि रणवीर डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सध्या  रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याच लग्नाची चर्चा चांगली रंगत आहे. चाहते देखील आपल्या या आवडत्या कलाकारांविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक आहेत. लग्न कुठे होणार इथपासून ते पोषाख, मेन्यू, संगीत काय असेल याबद्दल रोजच्या रोज वेगवेगळया बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
लग्नाआधीचे विधी आणि अन्य कार्यक्रम सुरु झाले आहेत अशी माहिती आता समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे इटलीमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार आहे. १४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे. इतकेच नाही तर  दीपिका नुकतीच नंदी पूजेसाठी बंगळुरुला तिच्या घरी गेली होती हेही सर्वांना माहीतच आहे.
रणवीर सिंग सिंधी आहे त्यामुळे १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होणार आहे. इटलीत लेक कोमो येथे दोघ लग्न करतील अशी चर्चा होती. बॉलिवूडमधल्या आपल्या मित्र परिवारासाठी दोघांकडून एक डिसेंबरला मुंबईत भव्य स्वागतसोहळा आयोजित केला जाईल अशी चर्चा आहे.  १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर  १६ तारखेला सर्व पाहुणे मायदेशी परततील. दीपिका-रणवीर कुठला पोषाख परिधान करणार ? काय दागिने घालणार ? ते आधीच ठरले आहे. मागच्या महिन्यात ऑक्टोंबरमध्ये त्यांनी टि्वटरवरुन लग्नाची घोषणा केली. तेव्हापासून प्रसारमाध्यमांचे दोघांवर बारीक लक्ष आहे. त्यावेळी त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग करण्याबद्दल कुठलीही माहिती दिली नव्हती.
जाहिरात