Deepika Padukone | एक काळ होता तेव्हा मी एकटी पडले होते; दीपिकाने शेअर केला रणवीरसोबतचा व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील सुप्रसिद्ध कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका (Deepika Padukone And Ranveer Singh) हे नेहमी चर्चेत असतात. रणवीर आणि दीपिका त्यांचे एकमेंकांवरील प्रेम सतत व्यक्त करतात. सोशल मीडियावर देखील या कपलची खूप चर्चा रंगते. या लोकप्रिय कपलचा मोठा चाहता वर्ग आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून नवनवीन फोटोशूट व आगामी चित्रपट याबाबत माहिती देत असतात. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone And Ranveer Singh) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणवीर व दीपिका अनेकदा त्यांचे फोटो व व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करतात. अगदी एअरपोर्ट, इव्हेंट यामध्ये ते त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात. नुकताच अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिचा रणवीर सोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ (Chennai Express) मधील डायलॉग बोलताना व्हिडिओ शेअर केला आहे. 2013 साली दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटामध्ये दीपिका व अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) प्रमुख भूमिका साकारली होती. यामध्ये दीपिकाचे पात्र हे कॉमेडी असल्यामुळे अनेकांनी ते डोक्यावर घेतले. चित्रपट देखील हिट झाला. मात्र आता 10 वर्षांनंतर दीपिकाने तिच्यासाठी कॉमेड़ी पात्र साकारणे कठीण होते हे कबुल केले असून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दीपिकाने व्हिडिओमध्ये चेन्नई एक्सप्रेसमधील “कहां से खरीदी ऐसी बकवास डिक्शनरी” हा लोकप्रिय डायलॉग म्हटला आहे. रणवीर आणि दीपिकाच्या या मस्तीखोर व्हिडिओ खाली तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “त्यांच म्हणणं आहे की, एका ॲक्टरसाठी सगळ्यात कठिण जॉनर हा कॉमेडी हा आहे. त्यामुळे जेव्हा मला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ ऑफर करण्यात आली, तेव्हा मला माहीत होतं की, माझ्यासमोर एक कठीण आव्हान आहे.

आणि मीनम्मा शोधण्यात मला थोडा वेळ लागला, तेव्हा एक अशी प्रक्रिया होती की, मी एकटी पडले होते. हे अनेकदा भयानक आहे, पण मी आभारी आहे की, आम्ही एक असं पात्र बनवण्यात सक्षम झालो जो केवळ चित्रपटाचा पर्याय नाही तर आज पर्यंत लक्षात आहे. आज पर्यंत तुमचं खूप प्रेम मिळालं आहे.” अभिनेत्री दीपिका पादुकोन हिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर ऱणवीर सिंहने देखील कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “THANGABALi !!!!!!!!!!!! hahaha! Cult stuff! आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिनेमापैकी एक! मीनम्मा म्हणून तुला पाहिल्यावर मी थक्क झालो! हे पात्र तू तुझ्या शैलीत साकारलंस आणि हे तूच करू शकतेस. याच वर्षी मला नैना आणि लीला सापडल्या !” त्य़ाचे हे प्रेम पाहून नेटकरी देखील खूश आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग (Deepika Padukone And Ranveer Singh) यांच्या जोडीचा
चाहता वर्ग मोठा आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्यांना कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी रणवीरचा वाढदिवस देखील झाला. यावेळी या कपलने एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला.
त्याचा नुकताच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दीपिकाकडे देखील अनेक बिग बजेट चित्रपट आहेत.
लवकरच ती ‘प्रोजेक्ट के’ अर्थात ‘कल्कि 2898 AD’ (Kalki 2898 AD) या चित्रपटात झळकणार आहे.
तसेच तिचा ‘जवान’ (Jawan) व ‘फायटर’ (Fighter) हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | नरेंद्र मोदींनी काल खोटं सांगितलं, भाजप-शिवसेना युती कशी तुटली खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्तालयात ART टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण