Maharashtra Political News | नरेंद्र मोदींनी काल खोटं सांगितलं, भाजप-शिवसेना युती कशी तुटली खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) एनडीएच्या खासदारांची बैठक (NDA MP Meeting) पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोवा येथील एनडीएच्या खासदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती (BJP-Shiv Sena Alliance) संदर्भात मोठं विधान केलं. 2014 साली महाराष्ट्रात शिवसेनेने युती (Maharashtra Political News) तोडली होती, भाजपने नाही. पंतप्रधान मोदी यांच्या या विधानावर भाजपचे माजी नेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी खुलासा केला आहे. काल नरेंद्र मोदी जे म्हणाले ते अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य नाही, असा दावा खडसे यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, नरेंद्र मोदींनी खासदारांना जे सांगितलं ते अर्धसत्य आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता ( Opposition Leader) होतो. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यामुळे भाजपचे सरकार (BJP Government) येईल असा आम्हाला विश्वास होता. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे अनेकांना तिकिट देणे कठीण होते. म्हणून आमच्यात चर्चा सुरु झाली. त्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. निवडणुकीच्या दोन अडीच महिन्याआधीच युती तोडण्याचा आमचा निर्णय झाला होता. त्यानंतर भाजपने शिवसेने सोबत असलेली युती तोडली, असा दावा खडसे यांनी केला आहे. (Maharashtra Political News)

चर्चा करुन निर्णय घेतला

आम्ही पक्षात चर्चा करुनच निर्णय घेतला. पक्षाने एकमताने निर्णय घेतला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मीही होतो. फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. युती तोडायचे हे कुणी आणि कसे सांगावे? यावर आमच्यात चर्चा झाली. मला तातडीने मुंबईला बोलावून घेतले. देवेंद्र फडणवीस यांनीच युती तोडण्याची घोषणा करायला पाहिजे होती. मात्र, ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली.

मी युती तोडत असल्याचे सांगितले

मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन युती तोडत असल्याचे सांगितले.
जागा वाटपावरून युती होत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर सुभाष देसाई (Subhash Desai) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) आले.
युती तोडू नका असा आग्रह केला. त्यावर हा निर्णय माझा नसून तो पक्षाचा असल्याचे मी त्यांना सांगितले.
त्यावेळी हेच घडले होते. नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले ते सत्य नाही. केंद्राचे निरीक्षक त्यावेळी आले होते.
महाराष्ट्राचे प्रभारीही होते. त्यांनी मला युती तोडल्याची घोषणा करण्यास सांगितले, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

तेव्हा मलाच बदनाम केलं

युती तोडण्यामागे जागा वाटप हा मुद्दा होता. शिवसेना 171 जागांवर लढत होती. देशात भाजपचे वातावरण होते.
त्यामुळे अधिकच्या जागा मिळाव्यात अशी भाजपची इच्छा होती. म्हणून शिवसेनेसोबत असलेली युती तोडली.
आपली सत्ता येणार असा विश्वास होता. त्यामुळे युती तोडली.
मला काय वाटतं त्यापेक्षा पक्षाला काय वाटतं हे महत्त्वाचे आहे.
मात्र, तेव्हा मलाच बदनाम केले, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्तालयात ART टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण