Ananya Pandey | अनन्या पांडेला वाटते ड्रीम गर्ल 2 मधील पुजाबदद्ल इनसिक्योरिटी; पुजा आणि माझी होणार तुलना…!

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचा सिक्वेल असणारा चित्रपट येत्या 25 तारखेला (Dream Girl 2 Release Date) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. आयुष्मान खुराना हा चित्रपटामध्ये ‘पुजा’ हे पात्र साकारत आहे. प्रेक्षकांना देखील त्याच्या या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे. आयुष्मान खुरानाला ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या स्त्री वेशात अनेकांची विकेट पडली आहे. यावर आता अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने देखील प्रतिक्रिया दिली असून तिने आयुष्मानच्या लूकवर जळत असल्याचे तिने कबुल केले आहे.

सध्या आयुष्मान खुराना व अनन्या पांडे हे ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान त्यांनी एका शो मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी अनन्याला चित्रपटाबाबत व तिच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. अभिनेत्री अनन्या पांडेने सांगितले की तिची तुलना ही आयुष्मानच्या पुजा या पात्राशी केली जाणार आहे. असे होऊ शकते की प्रेक्षकांना पुजा ही जास्त आवडू शकते. अभिनेत्री अनन्याने असेही सांगितले की, जेव्हा आयुष्मान पूजाचा गेटअप घेऊन बाहेर यायचा तेव्हा तिला खूप इंसिक्योर वाटायचे. अभिनेत्री अनन्या पांडेची ही व्हिडिओ सोशल मीडिय़ावर तुफान व्हायरल होत आहे.

या मुलाखती दरम्यान, अनन्या पांडे हिने पुजा या पात्राविषयी तिचे मत मांडले. अनन्या म्हणाली की, “माझी आणि पुजाची सेटवर शूट करताना अनेकदा कॅट फाईट होत असायची. मी आयुष्मान सोबत तेव्हाच बोलायचे जेव्हा तो सेटवर ‘करम’ म्हणून आला असेल. जेव्हा तो पुजा म्हणून यायचा तेव्हा मी त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हते आणि बोलत सुद्धा नव्हते.” असा मज्जेशीर किस्सा अभिनेत्री अनन्या पांडेने शेअर केला आहे. तसेच ती म्हणाली की “पुजा ही शूटिंगवेळी काय किंवा प्रमोशनवेळी काय नेहमीच सुंदर दिसत आली आहे. मी कोणत्याही अभिनेत्याला स्त्री पात्र करताना एवढी वाह वाह मिळालेली कधीच पाहिली नाही.”

अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Pandey) पुजा पात्राबाबत तिची असणारी असुरक्षितता सांगितल्यानंतर अभिनेता आयुष्मानने देखील तिला प्रश्न केले. आयुष्मान म्हणाला की, “’तिला पुजाबद्दल एकदम मत्सर आहे. तिच्या आईचे नाव भावना आहे आणि हिच्या आतल्या भावनेमध्ये मत्सर आहे.” तसेच अनन्याने त्याला विचारले की “मी हॉट आणि सुंदर आहे असे तुम्हाला वाटत नाही का?” यावर आयुष्मानने उत्तर दिले की, “पूजाने तुमच्याकडून प्रेरणा घेतली आहे”. यावर उत्तर देत अनन्या म्हणाली की “पूजाने माझ्या सौंदर्यातून प्रेरणा घेतली आणि ती आता माझ्याही पुढे गेली आहे.“

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी