संजय भन्साळींच्या आगामी सिनेमात Ex बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत काम करणार दीपिका पादुकोण !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांच्या जोडीला अनेक सिनेमात पसंती मिळाली आहे. लवकरच ही जोडी आता एकत्र काम करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावरा या सिनेमात रणबीर आणि दीपिका एकत्र काम करणार आहेत. दोघांनीही सिनेमा साईन केला आहे. संजय लीला भन्साळी दोघांशीही याबाबत बोलत आहेत अशीही माहिती आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, लॉकडाऊन संपल्यानंतर या मुव्हीची बातचित पुढे होणार आहे. लॉकडाऊनच्या आधीही भन्साळींनी रणबीर आणि दीपिकाशी संवाद साधला आहे. लॉकडाऊनमुळं बॉलिवूडचा पूर्ण कारभार ठप्प झाला आहे. खुद्द भन्सांळींनी मात्र याबद्दल कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही.

https://www.instagram.com/p/B_5Rdrthihz/

असंही समजत आहे की, या सिनेमासाठी शाहरुख खान, सलमान खानपासून तर रणवीर सिंह पर्यंत नावं समोर आली होती. परंतु रणवीरला दीपिकासोबत चौथ्यांदा पडद्यावर आणण्याची भन्साळींची इच्छा नव्हती. रिअल लाईप पार्टनरपेक्षा रणबीर कपूर सोबत दीपिकाची जोडी बनवू इच्छित होते.

https://www.instagram.com/p/B_5ANkMlo5T/

जर हा सिनेमा चांगला तयार झाला तर ही दुसरी वेळ असेल की, रणबीर कपूर संजय भन्सांळींसोबत काम करताना दिसेल. याआधी त्यानं सांवरिया या डेब्यू सिनेमात काम केलं होतं.