सुनंदा पुष्करवर ही बायोपिक, ‘ही’ आघाडीची अभिनेत्री साकारणार भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात कॉंट्रोव्हर्शियल हायप्रोफाइल मर्डर  केस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनंदा पुष्कर यांच्यावर आता बॉलिवूड मध्ये बायोपिक काढण्यात येणार आहे अशी माहिती मिळते आहे. अजून जरी या हत्याप्रकरणाचा छडा लागलेला नाही तरीदेखील सुंनदा  पुष्कर यांच्यावर बायोपिक निघणार हीच गोष्ट मोठी आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षकांची डिमांड पाहता बॉलिवूड आता बायोपिकवर विशेष काम करताना दिसत आहे. सध्या हिंदी सिनेसृष्टीत बायोपिक, थ्रिलर आणि ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेन्ड आहे. त्याच ट्रेन्डचा विचार करता सुनंदा पुष्कर यांच्या हत्याकांडावर एक सिनेमा येण्याची शक्यता आहे.अंधाधुनचे डायरेक्टर श्रीराम राघवन यांना असिस्ट केलेले शिवम नायर हा चित्रपट बनवत आहेत.

दिल्ली येथील लीला पॅलेस हॉटेलच्या रुम नंबर ३४५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यू बाबतचे गूढ अद्याप कायम आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी म्हणजेच सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा आहे. लवकरच तिच्याशी चर्चा केली जाईल असे दिग्दर्शक शिवमने म्हटले आहे.

या घटनेवर तयार होईल चित्रपट –

बिझनेस वुमन आणि पॉलिटीशियन शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू ७ जानेवारी २०१४ मध्ये झाला होता. सुरुवातीला सुनंदा यांनी आत्महत्या केली असे बोलले जात होते. नंतर त्यांच्या शरीरावर जखमा दिसल्या. यानंतर त्यांचा मर्डर झाला अशा चर्चा झाल्या. या प्रकरणी एक मोठी कंट्रोवर्सी झाली. १ जुलै २०१४ रोजी एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दावा केला की, या प्रकरणाचा खोटा रिपोर्ट दाखवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या एसआटीने सव्वा चार वर्षांनंतर चार्जशीट दाखल केला होता. अखेर यावर्षी एप्रिलमध्ये दिल्लीच्या कोर्टाने पोलिसांच्या चार्जशीटची दखल घेतली.

शशी थरुर याप्रकरणी अबेटमेंट टू सुसाइडनुसार आयपीसी ट्रायलचा सामना करत आहेत. त्यांच्यावर पुरावे मिटवण्याचे आरोप आहेत. चित्रपटाच्या सुत्रांनी सांगितले की, सुनंदाने आपल्या मृत्यूमागे अनेक प्रश्न सोडले आहेत. त्याच्या कड्या जोडत चित्रपटाची प्लानिंग करण्यात आली आहे. मेकर्स सुनंदाच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला अप्रोच करणार आहेत.

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदा पुष्कर यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र शशी थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर काही वर्षातच सुनंदा पुष्कर यांची हत्या करण्यात आली. सध्या सुनंदा पुष्कर यांच्या खुनाचा खटला दिल्लीतील पटियाला न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणात शशी थरूर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हे एक गूढ होतं याच गुढाभोवती सिनेमाची कहाणी फिरणार असल्याचे समजते आहे. शशी थरूर यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या सिनेमाचे नाव काय असेल हेदेखील अद्याप समजलेले नाही.