इरफान खानला पाहून दीपिकानं मध्येच सोडला इंटरव्ह्यु ! ‘अशी’ दिली ‘जादू की झप्पी’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड सुपरस्टार इरफान खान सध्या या जगात नाही. त्याच्या निधनानंतर चाहते अजूनही त्याला खूप मिस करत आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ आजही समोर येताना दिसत आहेत. अशात बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यावरून हेही दिसत आहे की, दीपिका इरफानवर किती प्रेम करते आणि त्याचा तिला किती आदर आहे.

दीपिकाचा एका व्हिडीओ समोर आला आहे जो तिचा हॉलिवूड सिनेमा XXX : Return of Xander Cage च्या प्रीमीयरचा आहे असं सांगितलं जात आहे. यात दिसत आहे की ती मीडियासोबत बोलत आहे आणि इतक्यात इरफान खानची एन्ट्री होते. दीपिका इंटरव्ह्यु सोडून त्याला ग्रीट करते. आदरानं त्याला हग करताना दिसते. ती सतत बोलते की, माझा सर्वात फेवरेट माणूस. चाहत्यांनाही दीपिकाचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

इरफान खान आणि दीपिका पादुकोण यांनी पीकू सिनेमात एकत्र काम केलं होतं. याशिवाय बिल्लू बारबर बाजीराव मस्तानी या सिनेमातही इरफान खान आणि दीपिका पादुकोण एकत्र काम करताना दिसले होते.