Video : कर्नाटकाच्या विधान परिषदेत ‘राडा’, आमदारांनी सभापतींना खुर्चीवरून खेचले

बंगळुरू : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही काळापासून सभागृहामध्ये गोंधळ, कागदपत्रे भिरकावणे हे देशातील संसदेपासून विधिमंडळांपर्यंत नित्याचेच बनले आहे. मात्र मंगळवारी (दि. 15) कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये (Karnataka assembly) लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला. गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले मदतभेद हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यातच दोन्ही बाजूच्या सभासदांनी थेट सभापतींच्या आसनापर्यंत धाव घेत सभापतींना त्यांच्या खुर्चीवरून (karnataka-legislative-council-speaker-pulled-chair) उठवले.

 

 

 

 

 

आज घडलेल्या घटनेबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश राठोड यांनी सांगितले की, भाजपा आणि जेडीएसने सभापतींना सभागृहाचे आदेश नसताना अवैधपणे खुर्चीवर बसवले. असे करून भाजपाने असंवैधानिक पाऊल उचलले. काँग्रेसने त्यांना खुर्चीवरून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर आम्हाला त्यांना खुर्चीवरून हटवावे लागले.