‘त्या’ ६३६ उपनिरीक्षकांच्या वैधतेला ‘मॅट’ची स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २०१६ च्या खात्यातर्गंत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र ठरविण्यात आलेल्या ६३६ उमेदवारांच्या पात्रतेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणने (मॅट) आज (गुरुवार) स्थगिती दिली आहे. खुल्या प्रवर्गातील या उमेदवारांची नियुक्ती गृह विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, काही उमेदवारांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतल्याने मॅटने आज ही स्थगिती दिली.

उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा विविध कारणामुळे चर्चेत राहिली आहे. गुणवत्तेच्या आधारावर नियुक्त करण्यात आलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील ५३१ उमेदवारांना आरक्षणातून पदोन्नती मिळाल्याने गृह विभागाने प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणातील पदोन्नती रद्द करण्याचे आदेश दिल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आली. तर त्याचवेळी गृह विभागाने गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गातील ६३६ उमेदवारांची निवड करून त्यांची यादी एमपीएससीकडे पाठवली होती.

मात्र, मागासवर्गीय उमेदवारांनी आपली निवड ही सरळसेवा भरतीतून झाल्याचे मॅट न्यायालयाला पटवून दिले. त्यानंतर त्यांना उपनिरीक्षक म्हणून पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे या परीक्षेतील मूळ पदापेक्षा अधिक जणांची निवड झाल्याने काही उमेदवारांनी एमपीएससी शिवाय गृह विभागाने परस्पर निवडलेल्या खूल्या उमेदवारांच्या निवडीच्या विरोधात आक्षेप घेतला आहे. गुरुवारी त्याबबात सुनावणी झाली. मॅटने त्यांच्या वैधतेला स्थगिती दिली आहे. यापुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –