सतपाल महाराजांच्या माळ्याचा संशयास्पद मृत्यू, ‘कोरोना’वर मात करून परतले होते

देहरादून : वृत्तसंस्था – उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या 70 वर्षीय माळ्याचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. असे सांगितले जातेय की, सतपाल महाराज यांच्या घरी माळी काम कर होता. पर्यटन मंत्र्यांच्या कुटुंबातील 22 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यामध्ये या माळ्याचा देखील समावेश होता. 10 जून रोजी माळी कोरोनावर उपचार करून बारा झाला होता. यानंतर प्रशासनाने त्याला घरी सोडले होते. आता त्यांचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 108 अ‍ॅम्ब्युलन्समधून त्याचा मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवून दिला.

एसओ अमरजीतसिंग रावत म्हणाले की, सकाळी सहकार्यांनी नर्सरीमध्ये राहणाऱ्या माळ्याला फोन लावला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यावेळी चीता पोलिसांना त्याच्या घराकडे पाठवण्यात आले. त्यांनी देखील बाहेरून फोन लावला, मोठ्या आवाज दिला तरी देखील माळ्याने फोन उचलला नाही किंवा हाकेला प्रतिसाद दिला नाही. रतन बाहूदर हा सिक्किमचा रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मोहम्मदपूर येथील ब्रह्म वाटिका नर्सरीमध्ये माळी काम करत होता.

फाशी घेऊन आत्महत्या
कोरोना संक्रमण दरम्यान काम मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा 36 वर्षाचा मुलगा संजू उर्फ भूरी हा मजुरीचे काम करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. तो आपल्या वृद्ध आई – वडीलांसोबत बनखंडी येथे रहात होता. तर मोठा मुलगा देहरादूनमध्ये कामाला होता. सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर रतन बहादुर हा झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार समोर आला.