Dehu Raod Crime News | कोयत्याने वार करत पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड: Dehu Raod Crime News | देहूरोडमध्ये पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत गिलानी समाझी कुरेशी (वय ४६ शितळानगर, देहूरोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि २४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक कारणांवरून पती – पत्नीमध्ये भांडण झाले. यामध्ये पतीने कोयत्याने हल्ला करत पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत ४६ वर्षीय पत्नीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.(Dehu Raod Crime News)
पतीने कौटुंबिक वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत तुला खल्लास करून टाकतो म्हणत कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव याबाबत तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा