दिल्ली विधानसभा : BJP चे उमेदवार कपिल मिश्रांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या मॉडल टाऊनमधून उमेदवार असणाऱ्या भाजपचे कपिल मिश्रा एक वादग्रस्त ट्विट करून फसले आहेत. निवडणूक आयोगानं पोलिसांना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कपिल मिश्रांच्या मिनी पाकिस्तानवाल्या वक्तव्यावर रिटर्निंग ऑफिसरनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगानं त्यांना वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यास सांगितलं होतं. आयोगानं हे ट्विट काढण्यासाठी ट्विटरलाही सांगितलं आहे.

आपल्या वक्तव्यावर कायम असणारे कपिल मिश्रा म्हणाले, “मी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर देईन. खरं बोलणं हा काही गुन्हा नाही.”

23 जानेवारी रोजी केलं होतं ट्विट
एएननं दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी 23 जानेवारी रोजी ट्विट केलं होतं. त्यांनी म्हटलं होत की, 8 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक ही भारत विरूद्ध पाकिस्तान अशी असणार आहे. निवडणूक आयोगानं हे ट्विट वादग्रस्त असल्याचं सांगितलं आणि हे ट्विट काढून टाकण्यास सांगितलं.

कपिल मिश्रा यांनी म्हटलं होतं की, “नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहीन बागमध्ये मोर्चा सुरू आहे. लोकांना कामाला जाता येत नाहीये. लोकांना शाळा आणि रुग्णालयात जाण्यासाठीही अडचण येत आहे. मोर्चाच्या ठिकाणी देशाविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. विरोधी पक्षाचे नेतेही या मोर्च्यात येत आहेत. यावरून स्पष्ट होतं की, हा मोर्चा राजकीय आहे.”

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like