दिल्ली निवडणूक : ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार ‘CM’ अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० (Delhi Assembly Election 2020) चे काउन्ट डाउन सुरु झाले आहे. अशात सर्वात आधी आम आदमी पार्टी ने ७० जागेंसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे १६ जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २० जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी केजरीवाल रोड शो करणार असल्याचे देखील सूत्रांकडून समजत आहे.

४६ विद्यमान आमदारांना देण्यात आली तिकिटे
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या लिस्ट नुसार, पार्टीने जवळपास ४६ विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. तसेच १५ आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. या लिस्टमध्ये ८ महिला उमेदवारांचे नाव आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पार्टीने ६ महिला उमेदवारांना तिकीट दिले होते.

गोपाल राय यांना देखील मिळाले तिकीट
केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या व्यतिरिक्त अन्य मोठ्या नावांबद्दल बोलायचे झाले तर तिमारपूरचे दिलीप पांडे, कालकाजी चे आतीशी, राजेंद्र नगरचे राघव चड्ढा, मालवीय नगरचे सोमनाथ भारती, मटिया महल चे शोएब इकबाल द्वारकाचे विनय कुमार मिश्र, नजफगडचे कैलास गेहलोत, बाबरपूरचे गोपाल राय निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.

२०१५ : ६७ जागांवर जिंकले होते ‘आप’
दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीचा सामना काँग्रेस आणि बीजेपी बरोबर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर बाजी मारुन एकहाती सत्ता घेतली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like