भोजपुरी अभिनेता निघाला कार चोर; चित्रपट निर्मात्यासोबत करत होता चोरी

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – दिल्ली पोलिसांनी भोजपुरी चित्रपटात काम करणार्‍या भोजपुरी चित्रपट तयार करणार्‍या कलाकारासह 2 लोकांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही कार चोरत होते आणि लोकांना नकली नोटा देऊन त्यांची फसणवणूक करत होते, असा त्यांचा फंडा होता.

दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. संशयित आरोपींकडून पोलिसांना सुमारे 50 लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. यातील काही नोटा ह्या लहान मुलांच्या खेळण्यातील आहेत. ज्याला चूरन अथवा खोट्या नोटा असं म्हणतात. खरंतर, दक्षिण पूर्व जिल्ह्यातील अँटी थेफ्ट स्कॉडला याप्रकणाची गुप्त खबर मिळाली होती. त्याच्या आधारावर त्यांनी या संशयित आरोपींना पडकलं आहे.

राज सिंह उर्फ मोहम्मद शाहद आणि सय्यद जेन हुसेन अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना न्यू फेंडस् कॉलनी मार्केटमधून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची स्कूटर देखील जप्त केली आहे. हि स्कूटर त्यांनी जामिया परिसरातून चोरली होती.

साऊथ ईस्टच्या डीसीपी आरपी मीना यांनी सांगितले की, राज उर्फ शाहिदने बर्‍याच भोजपुरी चित्रपटांत काम केलं आहे. त्याने इलाहाबाद इस्लामाबाद नावाचा एक चित्रपट तयार केला आहे. शाहिदने दिल्लीच्या आश्रम भागातही साहिल सनी चित्रपट निर्मितीची कंपनी देखील चालविली आहे. याबाबत पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शाहिदने कमी वेळेत अधिक पैशांची कमाई करणासाठी तो सामान्य लोकांची फसवणूक करण्या सुरूवात केली.

डीसीपीच्या म्हणण्यानुसार, शाहिद एक नोटाच्या बदल्यात तीन नोट देत होतो, त्यामुळे त्याच्या जाळ्यात सामान्य लोक अडकले. अशावेळी तो या लोकांच्या हातात नकली नोट ठेवत होता. जेव्हा लॉकडाउनमध्ये काम थांबले तेव्हा शाहिदने सय्यद हुसेन याच्याबरोबर हातमिळविणी केली. आणि या दोघांनी चोरी करण्याचा फंडा वापरला. आता या दोघांना पोलिसांनी स्कूटर चोरी केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं आहे. आता पोलिस आरोपींकडे पुढील चौकशी करीत आहेत.