धक्‍कादायक ! DCW कडून सलग तिसर्‍या दिवशी ‘धाड’सत्र, एकाच मॉलमध्ये 35 ‘स्पा सेंटर’, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नवादा येथील मसाज पार्लरवर छापा टाकल्यानंतर आज त्यांनी त्यांच्या टीमसह दिल्लीच्या राजौरी गार्डनमधील मॉलमध्ये छापा टाकला असता चकित करणारी माहिती समोर आली आहे. या मॉलमध्ये एक किंवा दोन नव्हे तर ३५ हून अधिक स्पा केंद्रे कार्यरत आहेत. त्यांपैकी अनेक विनापरवाना असून अवैधपणे चालू आहेत.

डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल मॉलमध्ये गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून त्यांना तेथे असल्याची माहिती देऊन तात्काळ बोलावले. पण त्यादरम्यान स्पा सेंटरच्या मालकांना याबाबत माहिती मिळाली आणि बहुतेक स्पा बंद करून तेथून निघून गेले. तपासणी केली असता मॉलमध्ये काही स्पा होते जे मोकळे होते आणि त्यातील बरेच परवान्या विना चालू होते. मालीवाल यांच्या नेतृत्वात दिल्ली महिला आयोगाच्या टीमने मॉलमध्ये प्रवेश करताच स्पाचे सर्व कर्मचारी आणि पुरुष ग्राहक तेथून पळून गेले.

येथील जवळपास सर्व स्पा केंद्रांवर स्पष्टपणे लिहिलेले होते की केवळ पुरुष ग्राहक असतील आणि केवळ महिलाच मालिश करतील. दिल्ली महिला आयोगाने सलग तिसर्‍या दिवशी स्पा सेंटरच्या अचानक तपासणीचे सत्र सुरु ठेवले आहे.

बुधवारी केली होती कारवाई :
यापूर्वी बुधवारी स्वाती मालीवाल यांनी नवादा येथील मसाज पार्लरवर छापा टाकला आणि तिच्यावर तेथे सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप केला. यासंदर्भात मालिवाल यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली की मसाज पार्लरमध्ये छापेमारी दरम्यान बरेच कंडोम आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. ते म्हणाले की, मसाजच्या नावाखाली दिल्लीत वेश्याव्यवसाय चालू आहे.

मालीवाल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आम्ही नवादाच्या चमेली स्पा आणि जन्नत स्पा येथे पोहोचलो तेव्हा आम्हाला धक्का बसला. प्रत्येक खोलीत मुलीबरोबर नग्न पुरुष आढळले. कंडोम मोठ्या प्रमाणात सापडले. मॅनेजर आणि मुलींनी कबूल केले की स्पामध्ये सेक्स रॅकेट चालू आहे.