दिल्लीत ज्या ठिकाणी काँग्रेस हिम्मतीनं लढलं तिथं झाला भाजपला ‘फायदा’

वी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० ची मतमोजणी सुरु झाली असून आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्लीत आपली सत्ता स्थापन करणार असल्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. सध्या ५८ जागांनी आप पुढे असून भाजपा १२ जागेंवर पुढे आहे. मात्र काँग्रेसने आपले खाते देखील उघडलेले नाही. आम आदमी पार्टीला मागील विधानसभेत ५७ जागा मिळाल्या होत्या, त्या मानाने आप ला यावेळेस कमी जनाधार मिळाल्याचे समोर येत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपा या वेळेस फायद्यात दिसत आहे. सांगण्यात येत आहे की ज्या जागांवर काँग्रेस मजबुतीने लढले होते त्याच जागांवर भाजपा ने आपली पकड मजबूत केल्याचे दिसत आहे.

भाजपाचे कपिल मिश्रा आपच्या उमेदवारापेक्षा पुढे
मुंडका येथून भाजपाचे उमेदवार आझाद सिंह यांनी आम आदमी पार्टीच्या धर्मपाल लकडा यांच्यावर मात करत तब्बल ६७२७ मतांची आघाडी घेतली आहे. धर्मपाल यांना ५७०४ मत मिळाली असून काँग्रेसचे नरेश कुमार यांना फक्त ४०५ मत मिळाली आहेत. तसेच मॉडेल टाऊन विधानसभा क्षेत्रातून आप चे अखिलेश त्रिपाठी हे ४४४६ मतांनी पिछाडीवर असून भाजपाचे कपिल मिश्रा हे पुढे आहेत. कपिल मिश्रा हे आम आदमी पार्टीला सोडून भाजपामध्ये शामिल झाले आहेत. त्यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत ४५४४ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या आकांक्षा ओला यांना ३०५ मतं मिळाली आहेत.

बल्लीमारन येथे कॉंग्रेसचे हारून खराब करत आहेत ‘आप’ चा खेळ
बनिया आणि मुस्लिम मतदारांची लोकसंख्या असलेल्या बल्लीमारन विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या लता ६७४६ मतांनी आघाडीवर असून त्यांनी आप च्या इम्रान हुसेन यांना पिछाडीवर सोडले आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत हुसेन यांना ६१२९ मते मिळाली आहेत. तर कॉंग्रेसचे उमेदवार आरोन युसूफ यांना ६६८ मते मिळाली. जनकपुरी विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर चालू आहे. या जागेवर आपचे उमेदवार राजेश ऋषी यांना आतापर्यंत ९९०८ मते मिळाली असून भाजपचे आशिष सूद यांना १०५४६ मते मिळाली आहेत. तर कॉंग्रेसच्या राधिका खेर यांना ३८८ मते मिळाली आहेत. बवाना विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रविंद्र कुमार १३,५५० मतांनी आप च्या जय भगवान यांच्या पुढे आहेत. जय भगवान यांना आतापर्यंत ८५७६ मते मिळाली असून कॉंग्रेसचे सुरेंद्र कुमार यांना ३०३४ मते मिळाली आहेत.

कालकाजी मध्ये आतिशी मार्लेना भाजपाच्या उमेदवारापेक्षा मागे
बऱ्याच काळापासून आंदोलनाची ओळख बनून असणाऱ्या शाहिन बाग परिसराला लागून असलेल्या कालकाजी या मतदारसंघाच्या जागेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना या जागेवर उभ्या आहेत. सध्या त्या आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपाच्या धरमबीर सिंग यांच्या पिछाडीवर आहे. अतिशी यांना ८२०५ मते मिळाली, तर धर्मबीर यांना ८३९६ मते मिळाली. कॉंग्रेसच्या शिवानी चोप्रा ९०५ मतांनी आपचा खेळ खराब करताना दिसत आहेत. कृष्णानगर च्या जागेवरही अशीच परिस्थिती आहे. येथे भाजपाचे डॉ. अनिल गोयल १८,७६४ मतांनी आप च्या एसके बग्गा यांच्या पुढे आहेत तर बग्गा यांना १७,१८५ मते मिळाली आहेत. या जागेवर कॉंग्रेसचे डॉ. अशोक कुमार वालिया १९५९ मतांनी आपचे गणित खराब करीत आहेत.