‘सेक्स वर्कर्स’ला नकार देण्याचा अधिकार, परंतु पत्नीला नाही; ‘मॅरिटल रेप’ वर Delhi High Court ची टिप्पणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delhi High Court| मॅरिटल रेप (Marital Rape) हा गुन्हा आहे की नाही यावर बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या मुद्द्यावर (Split Verdict) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे एकमत नव्हते (Delhi High Court). त्यामुळे आता हे प्रकरण 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले. त्यामुळे Marital Rape चे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे (Delhi HC On Marital Rape).

 

वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्याच्या बाजूने सुनावणीदरम्यान
न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी अत्यंत कठोर टिप्पणी केली. ते म्हणाले की, कायदेशीररित्या सेक्स वर्करलाही नाही म्हणण्याचा अधिकार आहे, परंतु विवाहित महिलेला हा अधिकार नाही. त्यांनी याला भेदभावपूर्ण म्हटले.

 

Marital Rape प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती हरिशंकर यांच्यात कायद्यातील तरतुदी हटवण्याबाबत मतभेद होते. त्यामुळे ते मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. खंडपीठाने याचिकाकर्त्याला अपील करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. (Delhi High Court)

 

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती हरिशंकर हा मुद्दा गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्याच्या बाजूने नव्हते. तर न्यायमूर्ती राजीव यांचे म्हणणे होते की, इच्छा नसताना पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल पतीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

 

यापूर्वी केंद्र सरकारने या मुद्द्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची बाजू घेतली होती,
मात्र नंतर यू-टर्न घेत त्यात बदल करण्याची बाजू मांडली.
21 फेब्रुवारी रोजी सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल मेहता यांनी न्यायालयाला म्हटले होते की,
या प्रकरणातील घटनात्मक आव्हानांसोबतच सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
कायदा, समाज, कुटुंब आणि घटनेशी संबंधित या प्रकरणी आपल्याला राज्य सरकारांचे मत जाणून घ्यावे लागेल, असे ते म्हणाले होते.

 

29% महिला लैंगिक हिंसाचाराच्या बळी
वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जात नाही, परंतु अनेक भारतीय महिलांना अजूनही याचा सामना करावा लागतो.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) नुसार, देशात अजूनही 29 टक्क्यांहून अधिक स्त्रिया अशा आहेत
ज्यांना पतीकडून केल्या जाणार्‍या शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.
ग्रामीण आणि शहरी भागातील तफावत तर अधिकच आहे. खेड्यांमध्ये 32% आणि शहरांमध्ये 24% महिला अशा आहेत.

 

Web Title :- Delhi High Court | delhi hc on marital rape sex workers have right to say no while married women dont

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Clotting Signs And Symptoms | अशी लक्षणं दिसल्यास लगेच सावध व्हा, नाहीतर रक्त गोठण्यामुळे होईल जीवघेणा त्रास

 

Steroids Affects | आकर्षक दिसण्यासाठी कुठेतरी तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत नाही ना?

 

Yoga Asanas For Hormonal Imbalance | हार्मोन असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात; ‘या’ आसनांच्या मदतीने मिळू शकतात फायदे