दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू होणार : गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

प्रस्तावित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक, दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा याच वर्षी एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. कोट्यवधी रूपये खर्चून बांधण्यात येणारा हा मार्ग देशातील दोन मोठ्य शहरांना जोडणार आहे.

[amazon_link asins=’B011BXFQAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ece3bf6a-a9c5-11e8-a3a9-2f65895266e4′]

या एक्स्प्रेस वेमुळे दिल्ली-मुंबई अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी होणार आहे. कारसाठी सध्या या अंतरासाठी २४ तासे लागतात तर या मार्गामुळे १२ तासात हे अंतर कापता येणार आहे. ट्रकसाठी ४४ तास लागतात तर या एक्स्प्रेसचा वापर केल्याने २२ तासात अंतर पार करता येणार आहे. १४५० किलो मीटरचे दिल्ली-मुंबई अंतर प्रस्तावित एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर १२५० किमी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या एक्स्प्रेस वेचे काम मार्गातील चाळीस वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू होणार असून हे काम वेगाने करण्यात येणार आहे.

गडकरी म्हणाले, आम्ही हे काम डिसेंबरमध्ये सुरू करणार असून तीन महिन्यात पूर्ण करणार आहोत. या प्रकल्पासाठी पैशाची कोणतीही कमतरता भासणार नाही.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ लगत हा मार्ग एक्स्प्रेस वे बांधण्याचे अगोदर ठरविण्यात आले होते परंतु, त्यामुळे प्रकल्पाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा विचार बदण्यात आला. हा नवीन मार्ग गुरगाव येथून सुरू होणार असून दिल्लीच्या बाहेरून मध्यप्रदेशातील अलवारकडे जाईल. तसेच तो येथील झाबुआ, रतलाम या दुर्गम भागांनाही जोडणार आहे. त्यानंतर गुजरातमधील बडोद्याला हा मार्ग जोडणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. दिल्ली-गुरगाव-मेवत-कोटा-रतलाम-गोध्रा-वडोदरा-सुरत-दहिसर-मुंबई असा हा एक्स्प्रेस वे असणार आहे.

क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना