अभिनेत्री डेलनाज ईराणी स्वतःच्या 50 व्या बर्थडेला चढणार बोहल्यावर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री डेलनाज ईराणी लवकरच तिचा प्रियकर पर्सी करकरियाबरोबर सात फेेरे घेऊ शकते. तिने लग्नाविषयी संकेत दिले आहेत. सांगितले की ती पर्सीशी तिच्या 50 व्या वाढदिवशी लग्न करू शकते. मात्र स्वत: अभिनेत्रीने याची हमी दिलेली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार डेलनाज लग्नासाठी सज्ज आहे. डेलनाज म्हणाली- ‘ बाहेरचे लोक सोडून द्या, पण माझे नातेवाईक मला माझ्या लग्नाबद्दल विचारत असतात. डेलू फुईचे लग्न कधी आहे ? मी लग्नाच्या विरोधात नाही, फक्त मी आणि पर्सी एकमेकांशी खूपच जवळ आलो आहोत. आम्ही इतर कोणत्याही विवाहित जोडप्यासारखे आहोत. आमच्यासाठी लग्न म्हणजे कागदाचा एक तुकडा ज्यावर आम्ही सही करु.’

डेलनाज-पर्सी 8 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत
पर्सीबद्दल, डेलनाज म्हणाली- ‘आज पर्सीशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही. आमच्या नात्याला आता 8 वर्ष झाले आहेत. माझ्यावर प्रेम करण्याबरोबरच तो माझी काळजी घेतो, माझा आदर करतो, जे एका महिलेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आमचं नातं असं आहे की ते खूप सुंदर आहे. पुढच्या वर्षी माझा 50 वा वाढदिवस मोठा करायचा आहे तर त्यादिवशी त्याच्याशी मी लग्न करीन अशी शक्यता आहे.’

वर्कफ्रंटबद्दल बोलताना, डेलनाज टाटा स्कायच्या नवीन शो ‘अद्भुत कहानिया’ मध्ये ‘हायजॅक’ मधील एका पोलिस भूमिकेत दिसणार आहे. हा क्राईम थ्रिलर आहे ज्यात डेलनाज शिवानी सिंग नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. डेलनाज नुकतीच ‘छोटी सरदारनी’ या मालिकेतही दिसली होती.

You might also like