Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढला; रत्नागिरी, जळगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Delta Plus Variant | कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूने वातावरणाशी जुळवून घेत स्वतःमध्ये बदल केले आहे. त्यातूनच डेल्टा व्हेरिएंट हा कोरोनाचा नवा स्टेन अस्तित्वात आला आहे. त्यामध्ये थोडाफार बदल होत डेल्टा प्लस व्हेरिएंटनचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या या व्हेरिएंटनं राज्यातील २४ जिल्ह्यात डोकं वर काढल आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या वाढू लागली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) आणि जळगावमध्ये (Jalgaon) या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण (Delta Plus Variant) आढळून येत आहेत.

दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत बाधितांचं प्रमाण वाढलेलं नाही.
त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट बाधितचे सोमवारी २७ रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची १०३वर पोहोचली आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून आता एकूण २४ जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचं निदर्शनास आलं आहे. विदर्भ आणि कोकण विभागात ५० टक्के रुग्ण आढळून आलेत.

जिल्ह्यानुसार डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांची आकडेवारी

जळगाव-१३, रत्नागिरी- १५, मुंबई- ११, कोल्हापूर- ७, ठाणे- ६, पुणे- ६, अमरावती- ६, गडचिरोली- ६, नागपूर- ५, अहमदनगर- ४, पालघर- ३, रायगड- ३, अमरावती- ३, नांदेड- २, गोंदिया- २, सिंधुदुर्ग- २, नाशिक- २, चंद्रपूर- १, अकोला- १, सांगली- १, नंदुरबार- १, औरंगाबाद- १, बीड- १, भंडारा- १.

 

Web Title : Delta Plus Variant | corona virus delta plus variant in increasing in this 24 districts of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेसवरून ‘आप’चे महापालिकेत आंदोलन, भाजपा-राष्ट्रवादीविरोधात जोरदार घोषणाबाजी (VIDEO)

Pune Corporation Amenity Space | राष्ट्रवादीच्या माघारी मुळे सत्ताधाऱ्यांनी अ‍ॅमिनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव ‘गुंडाळला’ !

Sangli Crime | कोडोली येथील माय-लेकीची वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या