राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – delta plus virus | कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आणि आता डेल्टा प्लस विषाणूचे संकट राज्यावर ओढवले आहे. राज्यात या विषाणूचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई शहर, उपनगरात एप्रिल महिन्यात दोन रुग्ण आढळून आले होते; हे दोन्ही रुग्ण बरे झाले असून, सध्या मुंबईत डेल्टा प्लस विषाणू (delta plus virus) चा एकही रुग्ण नसल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakaलग) यांनी दिली.
राज्यात डेल्टा प्लस विषाणू ( delta plus virus) ची लग्न झालेल्या रुग्णांची संख्या २१ आहे. त्यापैकी रत्नागिरी नऊ, जळगाव सात, मुंबई दोन तर पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७ हजार ५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. delta plus virus patients mumbai also became corona free

एप्रिल महिन्यात मुंबई शहर, उपनगरात डेल्टा प्लस विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले होते. मात्र, ते दोन्ही रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत या विषाणूचा एकही रुग्ण नसल्याची माहिती काकाणी यांनी दिली. दरम्यान काकाणी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत मास्क लावा, हात सतत धुवत राहा, तसेच गर्दीत जाऊ नका. ही कोरोना विषाणूपासून बचावासाठी त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीचे पालन केल्यास कोरोना, डेल्टा प्लस किंवा कोणत्याही प्रकारच्या विषाणूची बाधा नागरिकांना होऊ शकत नाही. यामुळे मुंबईकरांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उत्परिवर्तनामुळे तयार झाला नवा व्हेरिएंट

देशात सर्वप्रथम डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ हा कोरोना विषाणू (Corona Virus ) आढळून आला.
त्यानंतर त्यामध्ये आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरिएंट तयार झाला आहे.
सध्या मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल (Monoclonal antibody cocktail) उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे.
आफ्रिका, लंडन व इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणचे नवे स्ट्रेन आढळून आले आहेत.
आता भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत.
त्यांना स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावे देण्यात आली होती.
यातील डेल्टा स्ट्रेनचा ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या व्हेरिएंटवर कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता आहे.

Web Titel :  delta plus virus patients mumbai also became corona free

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक