सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ५०,००० ची मागणी

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन

सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ५०,००० रुपये अग्रीम मान्य करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बलराज मगर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे .

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बलराज मगर म्हणाले की, ‘१ जानेवारी २०१६ पासून वर्ग वर्ग-३ , वर्ग-४ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी बैठकीत आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही सातवा वेतन लागू झालेला नाही. सातवा वेतन आयोगाची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. त्यामुळे दिवाळी पर्यंत सातवा वेतन आयोग लागू होईल का नाही याबाबत साशंकता आहे.’

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17684a58-cc54-11e8-93ab-e97834ee5b46′]

ठरल्याप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू झाला नसल्या कारणाने १ जानेवारी २०१६ ते आज अखेर साधारण तीन वर्षांच्या वेतन फरकापोटी कर्मचाऱ्यांना ५०,००० अग्रीम दिवाळी पूर्वी मिळावे अशी विनंती मगर यांच्याकडून करण्यात आली आहे.

हे अग्रीम मिळाल्यास कर्मचाऱ्यांना सणासुदीचे दिवस अत्यंत आनंदी, उत्साही, व शासनप्रती समाधानाचे राहतील त्यामुळे ५०,००० अग्रीम दिवाळी पूर्वी मिळावे, असेही बलराज मगर म्हणाले.

[amazon_link asins=’B06XFLY878,B07G5D9R94′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2054d658-cc54-11e8-8355-3da45519289a’]