वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वाई : पोलीसनामा

संततधार पावसामुळे वाई तालुक्‍याच्या पश्चिम भागात घेवडा, वाटणा, मुग, चवळी, सोयाबीन बटाटा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पाऊस थांबत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. येथे कडधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरुच असल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: अडचणीत आला आहे. त्यामुळे शासनाने या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78060a7c-aa74-11e8-8b7b-d10ef88ce9a1′]

पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्याने खरीपाची १०० टक्के पेरणी केली. वाईच्या पश्चिम भागात भात शेती मोठ्या प्रमाणात असून भाताची लागण सर्वत्र झाली आहे. मात्र जुलैच्या मध्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची संततधार सुरु झाली. अजूनही ही संततधार सुरूच असल्याने हातातोंडाशी आलेली कडधान्याची पिके कुजू लागली आहेत आहे. अशा शेतीची पाहणी करून पंचनामे त्वरित करून वाई तालुक्‍याच्या पश्चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पश्‍चिम भागातील शेतकरी करत आहेत. त्या अनुषंगाने सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन वाईत करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत व त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या महिनाभर पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे भाताचे पिक समाधानकारक असले तरीही हाता-तोंडाशी आलेले कडधान्ये कुजून वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतीमध्ये पिकांसाठी शेतकऱ्यांनी वापरलेली बी-बियाणे, खते, औषधे, मशागत यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळे अडचणीतला पाय खोलात गेल्याचे चित्र वाईच्या पश्‍चिम भागात दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अन् यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणेकर सज्ज…