Demand of Bribe | 25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

25 हजाराच्या लाच मागणी (Demand of Bribe) प्रकरणी तलाठी अविनाश जाधव आणि खासगी व्यक्ती पंडित उमाजी जाधव यांच्यावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिक्रापूर (shikrapur) येथील जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी (Demand of Bribe) तलाठ्यासह (Talathi) खासगी व्यक्तीवर (Personal Person) पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन  ब्युरोकडून (Anti Corruption Bureau Pune) शिक्रापूर पोलिस ठाण्यात (shikrapur police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

अविनाश केवलसिंग जाधव Avinash Kewalsingh Jadhav (वय 32, रा. शिरूर) व पंडित उमाजी जाधव (वय 32) असे गुन्हा (FIR) दाखल  करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात (shikrapur police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Police Patil Problems | राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी ! मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर

अविनाश हे तलाठी शिक्रापूर सजाचे तलाठी (Talathi) आहेत.
यादरम्यान यातील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावावर शिक्रापूर येथे एक गुंठा जागा घेतली आहे.
या जागेची नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.
त्यावेळी लोकसेवक अविनाश यांनी सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी 30 हजार रुपयांची लाचेची मागणी (Demand of Bribe) केली.
याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानंतर याची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती पंडित यांच्या सांगण्यावरून मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार हा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

Web Title :  Demand of Bribe Anti-corruption case against private person including Shikrapur’s Talatha in bribery case of Rs 25,000