Dementia | अँटीबायोटिक्स औषधांनी वाढला ‘या’ धोकादायक आजाराचा धोका! ताबडतोब व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डिमेंशिया (Dementia) म्हणजेच स्मृतिभ्रंश हा असा आजार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीला तसेच त्याच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डिमेंशिया (Dementia) झाल्यामुळे वयानुसार व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडते.

 

यामुळे, पीडित व्यक्तीला त्याचे दैनंदिन व्यवहार करणे खूप कठीण होते, ज्यामुळे तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर अधिक अवलंबून असतो. वृद्धांमध्ये या आजाराचा प्रभाव इतर लोकांपेक्षा जास्त असतो. या आजाराची लक्षणे (Dementia) प्रामुख्याने वयाच्या 65 वर्षांनंतर दिसून येतात.

 

मात्र, हा आजार मध्यम वयापासूनच सुरू होतो. झोपेचा पॅटर्न, आहार आणि डिप्रेशन (Sleep Pattern, Diet And Depression) ही कारणे प्रामुख्याने या आजाराला कारणीभूत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एक अतिशय सामान्य औषध देखील स्मृतिभ्रंश वाढण्यास कारणीभूत आहे. हे औषध घेतल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढू शकतो.

 

PLOS One मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, मध्यम वयात, अँटीबायोटिक्सच्या (Antibiotics) सेवनाने हळूहळू व्यक्तीची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. विशेषत: महिलांना या समस्येला जास्त सामोरे जावे लागते. अभ्यासादरम्यान संशोधकांना असे आढळून आले की, बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून (Bacterial Infection) मुक्ती मिळवण्यासाठी अँटीबायोटिक्स घेतल्याने स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते.

 

या अभ्यासात अमेरिकेत राहणार्‍या 14,542 महिला परिचारिकांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासाच्या सुरुवातीला, सर्व महिलांना त्यांची स्मरणशक्ती मोजण्यासाठी संगणकीकृत चाचणी देण्यास सांगण्यात आले.

अभ्यासाअंती असे समोर आले की, ज्या महिलांनी मधल्या वयात सतत दोन महिने अँटीबायोटिक्स घेतले त्यांच्या स्मरणशक्तीवर (Memory) याचा खुप वाईट परिणाम झाला. या महिलांची स्मरणशक्ती खूपच कमकुवत झाली.

 

आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास डॉक्टरांकडून रुग्णांना अँटीबायोटिक्स दिली जातात. हा नवीन अभ्यास अँटिबायोटिक्सचा दीर्घकालीन वापर आणि त्याचे स्मरणशक्तीवर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करतो. पण अँटीबायोटिक्सच्या सेवनाने केवळ महिलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, हे अभ्यासात स्पष्ट झालेले नाही.

 

याशिवाय या अभ्यासात फार कमी लोकांचा समावेश करण्यात आला होता. अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे स्मरणशक्तीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी अधिकाधिक लोकांचा अभ्यासात समावेश करणे आवश्यक आहे.

 

डिमेंशियाची ही आहेत मुख्य कारणे (Risk Factors Of Dementia)

वय (Age)

आहार आणि व्यायाम (Diet And Exercise)

दारूचे जास्त सेवन (Excessive Alcohol Consumption)

हृदयरोग (Heart Disease)

डिप्रेशन (Depression)

डायबिटिज (Diabetes)

धुम्रपान (Smoking)

वायू प्रदूषण (Air Pollution)

डोक्याला गंभीर दुखापत (Severe Head Injury)

शरीरात जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता (Deficiency Of Vitamins And Nutrients In The Body)

 

डिमेंशियाची लक्षणे (Symptoms Of Dementia)

एकच गोष्ट सतत बोलत राहणे

एखादी गोष्ट न समजणे

स्मरणशक्ती कमजोर होणे

बोलताना अडखळणे

जुन्या सतत आठवत राहणे

जुने किस्से पुन्हा पुन्हा आठवत राहणे

कोणतीही गोष्ट लक्षात न राहणे

विचार करण्याची समजण्याची क्षमता कमी होणे

सतत काहीतरी बोलत राहणे

असंबंध बोलत राहणे

आजूबाजूला कोणी नसताना स्वतःशी बोलणे

गोष्टी लक्षात न राहणे

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Dementia | dementia this commonly prescribed drug can increases risk in women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी आजपासूनच सुरू करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

 

Stairs Workout | घराच्या पायर्‍यांवर ‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने सहज कमी करू शकता वजन; जाणून घ्या

 

When And What To Eat Before And After Exercise | व्यायामापूर्वी आणि नंतर कधी आणि काय खावे? जाणून घ्या वर्कआउट डाएटशी संबंधित माहिती