Dengue Fever | डेंग्यूच्या रूग्णांसाठी जीवघेणी ठरू शकतात 3 औषधे, ताप आल्यावर करू नका ‘ही’ चूक, योग्य उपचार जाणून घ्या

नवी दिल्ली : Dengue Fever | डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या कमी होते. खूप ताप येतो. अशावेळी स्वत: उपचार करणे टाळावे. चुकीचे औषध घेतल्याने डेंग्यूच्या रुग्णांची स्थिती गंभीर होऊ शकते. डॉक्टरांकडून डेंग्यूच्या उपचाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. (Dengue Fever)

ग्रेटर नोएडाच्या फोर्टिस हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन डिपार्टमेंटचे अ‍ॅडिशनल डायरेक्टर डॉ. दिनेश कुमार त्यागी यांच्या मते, डेंग्यूच्या रुग्णांवर घरी उपचार करता येत नाहीत. काही रुग्णांमध्ये तीव्र ताप, अंगदुखी, अंतर्गत रक्तस्त्राव आणि श्वास लागणे यासह गंभीर लक्षणे दिसतात. अशा रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली तातडीने योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. डेंग्यूची लक्षणे दिसल्यावर रक्त तपासणी करा आणि आवश्यकतेनुसार उपचार करा. (Dengue Fever)

चुकूनही घेऊ नयेत ही औषधे

डॉक्टर दिनेश कुमार त्यागी यांच्या मते, डेंग्यूची लक्षणे दिसल्यास वेदनाशामक औषधे, अँटीबायोटिक्स आणि अँटीव्हायरल औषधे घेणे टाळावे. तापासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेणे धोकादायक ठरू शकते. डेंग्यूमध्ये ही औषधे घेतल्याने प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते आणि स्थिती गंभीर होऊ शकते. (Dengue Fever)

डेंग्यूची गुंतागुंत टाळण्यासाठी ओव्हर-द-काउंटर पेन किलर आणि इतर औषधांसह स्वत: उपचार करणे टाळले पाहिजे. पेनकिलर घेतल्याने अंतर्गत रक्तस्रावाची स्थिती उद्भवू शकते.

डेंग्यूमध्ये फक्त हेच औषध सुरक्षित

डॉ. त्यागी म्हणतात की, डेंग्यूच्या बाबतीत पॅरासिटामॉलद्वारे सौम्य लक्षणे नियंत्रित करता येतात. पॅरासिटामॉल हे डेंग्यूसाठी सर्वात सुरक्षित औषध मानले जाऊ शकते, जे लोक आवश्यकतेनुसार घेऊ शकतात. याशिवाय थंड पाण्याच्या स्पंजिंगने डेंग्यू तापावर नियंत्रण मिळवता येते.

मात्र, एवढे होऊनही डेंग्यूची लक्षणे कायम राहिल्यास किंवा प्रकृती बिघडू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. अजिबात गाफील राहू नये.

या प्रकारचे अन्न फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, डेंग्यू झाल्यास भरपूर पाणी प्यावे, फळे आणि ताजे शिजवलेले अन्न खावे.
दूषित, शिळे किंवा उघडे अन्न टाळावे. डेंग्यूपासून बचावासाठी योग्य कपडे परिधान करा, जेणेकरून डास चावणार नाहीत.

विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांनी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे. आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
घरातील कंटेनर नियमितपणे रिकामे करा आणि स्वच्छ करा. बाथरूममध्ये पाण्याच्या बादल्या ठेवू नका.
मॉस्किटो रिपेलंट क्रीम आणि मच्छरदाणी वापरा. डेंग्यू लवकर ओळखून उपचार केल्यास तो लवकर बरा होऊ शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा : बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ