वातावरणात बदलामळे डेंगीच्या रुग्णात वाढ ! काळजी घेण्याचे आरोग्य खात्याची आवाहन

लोणी काळभोर : पोलीसनामा  ऑनलाइन – पूर्व हवेलीतील गावामध्ये डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून अनेकांना याची लागण झाली असून अनेकजण साथीच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत.याला पावसाची अनियमितता, ढगाळ वातावरण तसेच वातावरणात होणारा सततचा बदल यामुळे या आजारानी तोड वर काढलेे आहेे. पावसामुळे ठिकठिकाणी गवत वाढले असून डांसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्यात होणाऱ्या साथीचे रोग डेंग्यू,चिकुनगुनिया,मलेरिया, होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक असणारे सर्व उपाय योजना राबवण्याच्या सुचना ग्रामापंचायतीकडून देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील प्रत्येक वाॕर्ड,वाड्यावस्ती, गावठाण बाजार मैदान,यासर्व ठिकाणी फोगिग मशीनद्वारे औषध धुरळणी करण्यास ग्रामपंचायतच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुरुवात केली आहे. तसेच कुंजीरवाडी आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी एम यु लुकडे, यांनी थेऊर कुंजीरवाडी व परिसरातील गावांना भेट देऊन गावातील स्वच्छतेची पाहणी केली. थेऊरच्या आरोग्य सेविका, भारती सोनवणे यानी त्याच्या टीमसह प्रत्येक वार्ड वाड्यावस्तीवर जाऊन लोकांना या साथीच्या आजाराविषयी माहिती दिली.

या आजारांपासून कसे संरक्षण करायचे याची माहिती दिली तसेच जनावरांच्या गोठे, पाण्याच्या साठवण टाक्यातील पाणी तपासून जिथे पावसाचे पाणी साचले आहे त्याठिकाणी औषध फवारणी करुन केली व साठवण टाकीतील पाण्याची तपासणी करुन जास्त दिवसाचे पाणी असल्यास पाणी फेकून देऊन साठवण टाकी स्वच्छ करण्याचे नागरिकांना आव्हान केले आहे पाणी उकळून प्यावे, सर्दी ताप खोकला आल्यास तात्काळ आरोग्य केंदात जाऊन प्रतिबंधक उपचार घ्यावा असे आव्हान केले आहे असून पावसाळ्यात आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा असे आव्हान केले आहे.