Dental Cavity | तुम्हाला सुद्धा होत असेल डेंटल कॅव्हिटीचा त्रास? 5 गोष्टी देतील आराम, डेंटिस्टकडे जाण्याची नाही गरज

नवी दिल्ली : Dental Cavity | दातांमध्ये कॅव्हिटी म्हणजेच पोकळी असणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु प्रत्यक्षात ती दिसते तितकी सामान्य नाही. अनेक वेळा हा त्रास इतका वाढतो की लोकांना डेंटिस्टकडे जावे लागते. पण, बजेट किंवा व्यस्त वेळापत्रकामुळे शक्य होत नाही. मेडिकल न्यूज टुडे नुसार, कॅव्हिटीच्या समस्ये (Cavity problem) पासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता (How to Get Rid of Dental Cavity With Home Remedies).

ऑईल पुलिंगचा प्रयत्न करा :

कॅव्हिटीपासून मुक्त होण्यासाठी ऑईल पुलिंगची मदत घ्या. ऑईल पुलिंग ही भारतीय आयुर्वेदाची जुनी उपचार पद्धत आहे. यासाठी एक चमचा तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल तोंडात घ्या. (Dental Cavity)

नंतर हे तेल तोंडात सुमारे वीस मिनिटे इकडे-तिकडे फिरवा. यानंतर तेल थुंकून स्वच्छ पाण्याने तोंड धुवा.

एलोवेरा-टी ट्री ऑइलची मदत घ्या :

एलोवेरा जेल आणि टी ट्री ऑईल देखील दातांच्या कॅव्हिटीपासून आराम देते. यासाठी, अँटी-बॅक्टेरिअल तत्वांनी युक्त एलोवेरा जेल आणि टी ट्री ऑइलचे मिश्रण करून कॅव्हिटीच्या भागावर लावा. काही वेळ तसेच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा.

व्हिटॅमिन आणि मिनरल्स युक्त आहार :

दाताच्या कॅव्हिटीपासून वाचवण्यासाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट आवश्यक आहे. अशावेळी व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम युक्त गोष्टींचे सेवन करा. त्यामुळे कॅव्हिटी दूर होईल, शिवाय दातांची ताकदही वाढते.

गोड पदार्थांपासून दूर रहा :

गोड पदार्थ दातांच्या कॅव्हिटीला ट्रिगर करण्याचे काम करतात.
अशावेळी कॅव्हिटीची समस्या दूर ठेवण्यासाठी गोड पदार्थांपासून अंतर ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO सुद्धा डाएटमध्ये शुगर फ्री गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला देते. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे दातांचे नुकसान होते.

शुगर फ्री च्युइंगम चघळणे :

जेवणानंतर शुगर फ्री च्युइंगम चघळल्याने दातांच्या इनॅमलला नुकसान करणाऱ्या बॅक्टेरियाचा स्तर कमी होतो,
ज्यामुळे दातांचे इनॅमल मजबूत होते.
अशा प्रकारे तोंडातील बॅक्टेरिया दातांना हानी पोहोचवू शकत नाहीत आणि दात निरोगी राहतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yoga For Healthy Hair | केस गळती रोखण्यापासून वाढीपर्यंत, उपयोगी ‘हे’ 3 योगासन,
रोज सकाळी करा सराव