‘या’ अ‍ॅपव्दारे पोस्ट ऑफिसच्या RD अकाऊंटमध्ये जमा करा ऑनलाईन पैसे, जाणून घ्या सोपी पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांगल्या गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून पोस्टाकडे पाहण्यात येते. मात्र, गर्दीचा विचार करुन नागरिक पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याचे टाळतात. आता या त्रासातून आपली मुक्तता होऊ शकते. कारण यापुढे पोस्ट ऑफिसच्या रेकरिंग डिपॉझिट (RD) खात्यात आपल्याला घरबसल्या पैसे जमा करता येऊ शकतील. IPPB (India Post Payments Bank) या ऍपच्या सहाय्याने पोस्ट ऑफिस RD मध्ये ऑनलाइन पैसे जमा केले जाऊ शकतात. RD अकाउंटमध्ये महिन्यांचे हप्ते सुद्धा ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येतील.

कसे जमा कराल RD मध्ये ऑनलाइन पैसे ?
>> प्रथम IPPB अकाउंटमध्ये आपल्या बँक खात्याला ट्रान्सफर करा.
>> नंतर DOP प्रोडक्ट्सवर जाऊन रेकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडा.
>> मग RD अकाउंट नंबर आणि DOP कस्टमर आयडी टाका.
>> आता RD त इन्स्टालमेंट पीरियड आणि अमाऊंट टाका.

त्यानंतर आपल्याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे. तसेच IPPB सेव्हिंग्ज अकाउंटवर इंडिया पोस्टाच्या दुसऱ्या योजनेसाठी पेमेंट केले जाऊ शकते.

रेकरिंग डिपॉझिटचे काय आहेत फायदे ?
आपण पगारदार असाल आणि प्रत्येक महिन्याच्या पगारातील काही भाग रेकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवून पैसे वाचवू शकता. त्यासाठी आपण वेळ सुद्धा ठरवू शकता. कालावधी पूर्ण झाल्यावर आपल्याला एक चांगली रक्कम मिळू शकते. भारतीय पोस्टात RD मध्ये ५.८ टक्के व्याज देण्यात येते. RD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी रक्कम १०० रुपये असावी. अर्थात दर महिन्याला आपण १०० रुपये जमा करु शकतो.