Pimpri : पोलिस कर्मचार्‍याच्या भावाची हाताची नस कापून गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपळे गुरव येथील एका तरुणाने हाताची नस कापूस गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) समोर आली. दीपक रामचंद्र साबळे (वय ३१, रा. जयभवानी नगर, पिंपळे गुरव), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्ज आणि व्यवसायात यश येत नसल्याने नैराश्यातून हे पाऊल उचलत असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पोलिसांना आढळून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत दीपक हा सांगावी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी केतन साबळे यांचा लहान भाऊ होता. सर्व कुटूंब पिंपळे गुरव येथे वास्तव्यास होते. आईवडील बाहेर गेल्याने दीपक घरी एकटाच होता. तेव्हाच त्याने उजव्या हाताची नस कापून पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला. आईवडील परत आल्यानंतर हाक मारून सुद्धा दीपक याने प्रतिक्रिया दिली नाही. ही गोष्ट शेजारच्यांना सांगितल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता दीपक याने गळफास घेतल्याने निदर्शनास आले.

संदर्भात त्याचा भाऊ केतन साबळे आणि पोलिसांना कळवण्यात आले. कर्तव्य बजावत असलेल्या केतन यांनी तात्काळ घर गाठले. त्यानंतर दीपक याला पोलिसांनी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, मयत दीपक हा अविवाहित होता. २०१२ साली त्याने व्यवसाय सुरु केलेला. पण त्यात त्याला यश आले नाही. तसेच कर्ज सुद्धा झाले होते. यामुळे मागील दिवसांपासून तो नैराश्येत गेला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.