‘DES’मध्ये ‘योग’दिवस उत्साहात साजरा, झाले विविध कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रमणबाग कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. प्रा. अपर्णा भुजबळ यांनी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. पर्यवेक्षिका अनघा बागुल यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांनी योग साधना करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांकडून प्राणायाम करून घेण्यात आला. संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली योगगीत सादर करण्यात आले. मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.
DES

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगाचार्या विदुला शेंडे यांनी योगासने करून दाखविली. मुख्याध्यापक प्रीतम जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मकरासन, पद्मासन, वृक्षासन, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके सादर केली.

नवीन मराठी शाळेत योगदिनानिमित्त शाळेतील सर्व ११७५ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकतेरांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. योगशिक्षिका वासंती काळे यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठ्ये अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी मार्गदर्शन केले. डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये डॉ. मुलबागुल यांनी शिक्षकांना योगासनांचे प्रशिक्षण दिले.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची