अबब ! एका वर्षात ७ हजार ३०० भारतीय झाले कोट्यधीश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवा आर्थिक धोरणामुळे गरीब अधिक गरीब होत आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे बोलले जाते. देशातली गरीबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे. भारतीय कोट्यधीशांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ७ हजार ३०० जणांची भर पडली असल्याची माहिती समोर आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c22af7e-d364-11e8-a622-cfe5bd75622f’]

क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, २०१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. या नव्या लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. २०२० या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल ३ लाख ८२ हजारांवर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट स्विसने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०१८ च्या मध्यापर्यंत ३ लाख ४३ हजार कोट्यधीश होते. मागील वर्षी त्यांची संख्या ७,३०० ने वाढली. या नव्या कोट्यधीशांपैकी ३ हजार ४०० जणांकडे पाच-पाच कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८-३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे तर १ हजार ५०० जणांकडे १० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ७३६-७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

 क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे ९२ टक्के लोकांकडे १० हजार डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे.

डॉलर्सच्या तुलनेत भारताच्या एकूण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांनी वाढल्यामुळे ६,००० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. भारतातील श्रीमंती आणि गरीब यांच्यातील तफावत ५३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २०२३ पर्यंत भारतातील कोट्याधीशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. २०२३ मध्ये भारतामध्ये ५ लाख २६ हजार लोक कोट्याधीश होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b88389e-d368-11e8-b02f-894912afaab4′]