×
Homeताज्या बातम्याDevendra Fadnavis | एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं......

Devendra Fadnavis | एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादीत (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांवर टीका केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच दरम्यान खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे. या चर्चेवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शाह यांची भेट होऊ शकली नाही. पण एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली आहे, अशी माहिती खुद्द भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली. या खुलाशानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे.

फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया

खडसेंनी भाजप सोडल्यापासून देवेंद्र फडणवीसांशी (Devendra Fadnavis) असलेलं त्यांचं वितुष्ट जगजाहीर असल्यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये असल्याच्या चर्चेवर फडणवीसांची भूमिका महत्त्वाची आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांना खडसे यांच्या घरवापसीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अवघ्या एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, मला याबद्दल कल्पना नाही, एवढं म्हणून त्यांनी जास्त बोलणं टाळलं.

देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार – खडसे

दरम्यान, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान आहेत.
अमित शहा यांना भेटू नये, असा काही नियम आहे का, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे माझे जुने संबंध आहेत.
गोधडी मध्ये होते, तेव्हापासून परिचय आहे. मी अमित शहा यांना एकवेळा भेटलो असं नाही, याआधीही भेटलो आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी भेटणार आहे म्हणून याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही,
असे एकनाथ खडसे म्हणाले.

Web Title :-  Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis on eknath khadse meeting amit shah joing bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Moto Vault | मोटो व्हॉल्टच्या  पहिल्या शोरूमचे पुणे येथे उद्घाटन

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News