Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरीकरणाला पूर्वी अभिशाप समजला जात होता. मात्र, शहरात शिक्षण, आरोग्य, रोजगार तयार होत गेले. त्यामुळे शहरीकरण (Urbanization) वेगाने वाढत गेले, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. नगरविकास दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यंदा नगरविकास खात्याला (Urban Development Department) रेकॉर्डब्रेक निधी दिल्याचा दावा केला. तसेच विकास आराखडा तयार केला असला तरी त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काही महानगरपालिका (Municipal Corporations) आणि नगरपालिकांच्या (Municipalities) कार्यावर बोट ठेवलं.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं माझ्याकडे होतं. महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असताने हे खात एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. आता तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी नगरविकास खात्यात चांगले लक्ष घातलं आहे. शहरांमध्ये विकास आराखडे (City Development Plan) वेगाने मंजूर केले. काही वर्षांपूर्वी एकूण विकासाच्या प्रक्रियेत शहराचा विकास आराखडा आणि विकास यात कोणताच संबंध नव्हता. मात्र, आता मंजूर झालेला विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्य आणि केंद्राच्या संकल्पनेतून घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय वेगाने सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याला आजपर्यंतचा सर्वात जास्त म्हणजेच रेकॉर्ड ब्रेक निधी दिला आहे.
आज निधीची कोणतीही कमतरता नाही. मात्र कल्पकता आणि अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातो,
पण त्याचा तिन-चार वर्ष वापर केला जात नाही. काही नगरपालिका, महानगरपालिका निधी मिळाल्यानंतर देखील निवदा काढत नाहीत.
त्यामुळे यामध्ये पारदर्शिता आणण्यासाठी निर्णय घ्यावा लागणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

 

Web Title :-  Devendra Fadnavis | chief minister gave maximum funds for urban development but what exactly
did fadnavis say about the implementation of development plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे-सोमवार पेठ क्राईम न्यूज : समर्थ पोलिस स्टेशन – 9 टक्के मोबादला देण्याच्या आमिषाने 81 लाख 50 हजाराची फसवणूक

Gautam Adani | गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा; तपशील गुलदस्त्यात

Pune News | पुणे : रामदास आठवले, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभिनेते सयाजी शिंदे यांना
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार’ होणार प्रदान