Devendra Fadnavis | ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!, ‘स्वधार’ सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्याची फडणवीसांची घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वधार सारखी योजना (Swadhar Scheme) ओबीसी विद्यार्थ्यांना (OBC Students) लागू करण्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केली. यामुळे अनेक ओबीसी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना किमान पाच वसतिगृह (Hostel) सुरु व्हावे यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून ते लवकरच सुरु केली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विदर्भातील विकासाच्या प्रश्नावर आणि इतर मुद्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ही घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, स्वधार सारखी योजना आता ओबीसीसाठी ही सुरु करत आहोत. विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा व शिक्षणाचा खर्च त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जाणार आहे. याचा फायदा 31 जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना होणार आहे. पीएचडीसाठी अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. आता अशीच फेलोशिप आदिवासी विद्यार्थ्यांना (Tribal Students) दिली जणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच ओबीसी वसतिगृह खासगी संस्थांना नाही तर स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देणार आहे. अशा प्रकारची योजना समाजकल्याण खात्यामार्फत सुरु आहे. खासगी व्यक्तीकडे कोणतीही जबाबदारी दिली जाणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) सुरु केलेली स्वधार सारखी योजना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) बंद केल्याचा आरोप केला होता. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आघाडी सरकारच्या काळा अशी कोणतीही योजना लागू झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काय आहे स्वधार योजना?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) स्वधार योजना
ही महाराष्ट्रात 2016-17 मध्ये सुरु करण्यात आली होती. ही एक शैक्षणिक योजना आहे.
इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये
प्रवेश मिळालेल्या, मात्र कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेत निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान दिले जाते.

Web Title :- Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis announce swadhar likes scheme for obc students in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार

Lavasa City Case | लवासाप्रकरणी न्यायालयात पुन्हा याचिका; अजित पवार म्हणाले पवार कुटुंबावर…