Devendra Fadnavis | महायुतीत नसलेला कोणता नेता आवडतो?, देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘मी तीन…’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेकडून (IAA) मुंबईत आयएए लीडरशीप पुरस्काराचे (IAA Leadership Award) वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत (Interview) घेण्यात आली. तुमच्या महायुतीत (Grand Alliance) नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा कराल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी ‘पॉलिटिकली करेक्ट’ उत्तर देत उपस्थितांकडून टाळ्या मिळवल्या.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांना विचारलेले रॅपिड फायर प्रश्न

  • कोणत्या पक्षासोबत तुम्ही कधीच युती करणार नाही?

(Devendra Fadnavis ) फडणवीसांचे उत्तर – काँग्रेस.. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress)

  • काँग्रेसशिवाय कोणत्या नेत्याशी कधीच युती करणार नाही?

फडणवीसांचे उत्तर – राजकारणामध्ये (Maharashtra Political News) आम्ही कधीच शस्त्रू नसतो, आम्ही राजकीय विरोधक असतो. आम्ही काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात आहोत. त्यामुळे जो नेता काँग्रेसच्या विचारधारेशी चिकटून आहे, त्यांच्याशी कधीच युती करणार नाही.

  • महायुतीत नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा कराल?

फडणवीसांचे उत्तर – तस बघितलं तर अनेक नेते आहेत, मात्र, राजकारणात तुम्ही उघडपणे तसं बोलू शकत नाहीत.
सध्या, जर तुम्ही म्हणाला की या पक्षातील हा नेता उत्तम आहे, तर लगेच तेवढाच भागाचा व्हिडिओ कट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, आणि म्हणतात ‘बघा देवेंद्र फडणवीस हे माझं किंवा माझ्या नेत्याचं आणि पक्षाचं कौतुक करत आहेत’. हे माझ्यासाठी कठीण होऊन जाईल. त्यामुळे आपल्या खाजगी गप्पांमध्ये मी तुन्हा तीन नेत्यांची नावं सांगेन, ज्यांचं मला कौतुक वाटतं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, जर सगळे जण माझ्या पक्षाच्या विरोधात एकत्र येत असतील, तर मी एकटा लढेन असं
तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्हाला गेममध्ये राहूनच लढावं लागेल, असेही फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Debit Card | डेबिट कार्डधारक असाल तर तुम्हांला बॅंकेचे ‘हे’ नियम माहिती असणे गरजेचे