Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरेंच्या घरगुती मुलाखतीवर…’ देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवला (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Thackeray Group) यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची मुलाखत (Uddhav Thackeray Interview) घेतली. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ठाकरेंच्या या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची जी घरगुती मुलाखत आहे, त्यातलं एकही वाक्य प्रतिक्रिया देण्या लायक नाही, त्यामुळे माझा वेळ त्याकरता घेऊ नका, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील पुर परिस्थितीवर (Flood Situation) बोलताना फडणवीस म्हणाले,
मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती आहे. परंतु परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे.
ज्या ठिकाणी अडचणी होत्या तिथे एनडीआरफ (NDRF),
एसडीआरफ (SDRF)किंवा स्थानिक प्रशासन हे योग्यवेळी पोहोचलेलं आहे.
लोकांना मोठ्या प्रमाणात रेस्क्यु देखील करण्यात आले आहे.
यासोबत ज्या ठिकाणी घरांची परझड झाली आहे त्या ठिकाणी मदत करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी नुकतचं तातडीची मदत ही 5 हजारावरुन 10 हजार केली आहे. यापूर्वी आपण टपऱ्या दुकानांना मदत करत नव्हतो. त्यांना देखील आता 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याठिकाणी तातडीची मदत ही दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil on Sambhaji Bhide | ‘समाजात दुही माजवणाऱ्या….’,
संभाजी भिडेंच्या विधानावर जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया