Devendra Fadnavis | ‘तुला आगे ना पिछे…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची रविवारी पाचोऱ्यात सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लक्ष्य केलं. मोदींचा एकेरी उल्लेख करत ठाकरे म्हणाले, तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? या टीकेनंतर भाजप (BJP) नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ठाकरेंच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधानांची लोकप्रियता वाढत असल्याने ठाकरेंची निराशा वाढत असून तीच निराशा त्यांच्या तोडून बाहेर पडत असल्याचा टोला फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लगावला.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं, उद्धव ठाकरेंच्या भाषणात निराशा आणि तोच तो पणा होता. एकही नवीन मुद्यावर उद्धव ठाकरे बोलले नाहीत. काही नेते फक्त शिवराळ भाषा वापरतात. राज्याच्या विकासावर एक शब्दही बोलत नाहीत.

शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल, रोजगार निर्मिती कशी होईल, यावर ते बोलत नाहीत. त्यांच्या राजकीय जीवनात ते एक विकासाचा प्रकल्प करु शकले नाहीत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसत आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची निराशा वाढत आहे. तीच निराशा उद्धव ठाकरेंच्या तोंडून बाहेर येत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

बोलताना व्यक्तिगत टीका करु नका – बावनकुळे

मागेही मी सांगितलं होतं, सार्वजनिक ठिकाणी बोलताना व्यक्तिगत टीका करु नका.
त्यांनी आमच्या नेतृत्वाचा अपमान करु नये. स्फोट होईल एखाद्या दिवशी.
तुम्ही आमच्या नेतृत्वाचा एकेरी उल्लेख करताय, यामुळे एक दिवस स्फोट होऊ शकतो.
मी मागेही सांगितले होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा, असंतोष कधी भडकेल हे मला माहिती नाही,
असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis reply uddhav thackeray over pm narendra modi comment pachora sabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Cyber Crime News | पुण्यातील पोलिसाने 5 भाषेतून आदरयुक्त ‘आदेश’ देवून हस्तगत केले 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंकडून मोदींचा एकेरी उल्लेख, बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘बोलताना जरा तारतम्य बाळगा’ (व्हिडिओ)

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)