Devendra Fadnavis | आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर देणे फडणवीसांनी टाळले, एकाच वाक्यात म्हणाले – ‘ते उत्तर देण्यालायक…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीस सरकारकडून जाहिरातबाजीवर सुरू असलेली उधळपट्टी, शेतकरी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ, बेरोजगारी या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर घणाघती टीका केली होती. ते मुंबईतील एका दिवाळी संध्या कार्यक्रमात बोलत होते. या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे (Shinde Government) होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स पाहून मला मळमळायला लागले आहे.

आदित्य म्हणाले, खरे तर, सणासुदीपासून राजकारण बाजुला ठेवले पाहिजे. पण सर्वत्र उधळपट्टी सुरू आहे. त्यांनी महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकर्‍यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवे. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. केवळ उधळपट्टी सुरू आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ते काही उत्तर देण्यालायक नाहीत.

शिवसेना पक्षावरील दाव्यासाठी दाखल प्रतिज्ञापत्रांपैकी 2.50 लाखांपेक्षा जास्त बाद झाल्याचे बोलले जात आहे.
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगामध्ये (Election Commission) अशा प्रकारचे कोणतेही
प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा चिन्ह देणे याचे नियम ठरलेले आहेत.
गेल्या 20 वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत.
त्यामुळे कुणाची प्रतिज्ञापत्र (Affidavit) किती आहेत, कोणाची रद्द झालीत, कुणाची टिकली,
हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चालले आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis slams aaditya thackeray on eknath shinde bjp statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ठरविली

Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त