
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ठरविली
मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. खरी शिवसेना कोणाची या वादावर शिवसेनेकडून अनेक प्रतिज्ञापत्रे (Affidavit) देण्यात आली होती. त्यापैकी अडीच लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने रद्द केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा तोटा झाला आहे.
जून महिन्यात शिवसेना पक्षात ऐतिहासिक बंड झाले. यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात 40 आमदार आणि 12 खासदारांच्या गटाने शिवसेना सोडली. पण त्यांनी मूळ शिवसेना पक्षावरच दावा केला. त्यामुळे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठविले. त्यानंतर दोन्ही गटांना खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे दोन्ही गटांनी आयोगाला अनेक कागदपत्रे सादर केली. त्यातील आता शिवसेनेची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे रद्द ठरविण्यात आली आहेत.
दोन्ही गटांकडून शिवसेना आमचीच आहे, यासाठी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती.
यावेळी ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) दोन ट्रक भरुन प्रतिज्ञापत्रे आयोगाला पाठविण्यात आले होती.
ठाकरे गटाने 11 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाला पाठविली होती.
पण त्यापैकी अडीच लाख प्रतिज्ञापत्रे विहीत नमुन्यात नसल्याने बाद करण्यात आली आहेत.
त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रे बाद होणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Web Title :-Uddhav Thackeray | big setback to shivsena uddhav balasaheb thackeray group election commission rejects two and a half lakh affidavits
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update