Devendra Fadnavis | गृहमंत्री फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया, काँग्रेस उद्या राज्यपालांना भेटणार, पटोले म्हणाले, ”थोडी जरी…”

मुंबई : Devendra Fadnavis | शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पूत्र आणि माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांची काल रात्री फेसबुक लाईव्ह सुरूअसताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय वर्तुळात लागोपाठ दुसèयांदा अशी गोळीबाराची घटना घडली आहे. (Devendra Fadnavis )

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर विरोधीपक्ष आक्रमक झाले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, गृहमंत्र्यांनी विरोधकांच्या या मागणीवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा संतप्त पडसाद उमटू लागले आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. याबाबत पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतप्त झाले असून त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा यांच्यातील फरकही कळत नाही का?

नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य नाही. महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो. त्यानंतर ठाणे, मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो.

नाना पटोले म्हणाले, नागपूरच्या अधिवेशनात मी हे आकडेवारीसह मांडले होते.
राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहेत. तडीपार गुंडांना पोलीस संरक्षण दिले जात आहे.
भ्रष्ट व कलंकित आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन दिले आहे तर प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जातेय.

नाना पटोले म्हणाले, पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप व दबाव असल्याने ते काही करू शकत नाहीत.
गुंडांनी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात
अशी स्थिती कधीच नव्हती.

फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करताना नाना पटोले म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी नैतिकता
शिल्लक असेल, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

पटोले म्हणाले, वर्षा बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदिक्कतपणे सुरू आहे. तडीपार गुंडांना राजाश्रय आहे.
पोलीस दलातील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीस हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती
चिंताजनक आहे. हे गुंडाराज बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
यासाठी, काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Shivsena On Nikhil Wagle | विधाने मागे घ्या अन्यथा पुणे शहरात फिरु देणार नाही, शिवसेनेचा निखिल वागळेंना इशारा

मौजमजेसाठी मोबाईल व चैन चोरणाऱ्याला हिंजवडी पोलिसांकडून अटक

पुणे : बाललैंगिक कायदा व बलात्कारातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Avadhoot Gupte-Abhishek Ghosalkar | अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर अवधूत गुप्ते भावूक, म्हणाला – ”आईच्या आजारपणात मोठ्या भावासारखे…”

तरुणीचा पाठलाग करुन भररस्त्यात मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Pune Police News | पुणे : अवैध हातभट्टीवर गुन्हे शाखा व लोणी काळभोर पोलिसांचा छापा, 36 लाखांचे रसायन नष्ट (Video)