Devendra Fadnavis | 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली, देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांचा धुरळा उडवला होता. एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात मलिकांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. त्याचबरोबर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा दावा केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असा इशारा दिला होता. आज फडणवीस यांनी नवाब मलिकांवर अंडरवर्ल्डशी (underworld) संबंध असल्याचा पुराव्यासह दावा केला आहे.

 

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटातील (1993 Bomb blast) आरोपींकडून नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा (tada act) लागला होता. टाडा लागलेल्या आरोपींची संपत्ती जप्त केली जाते.
त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मालिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? 2003 मध्ये नवाब मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते.
1993 च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले, रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागचा हेतू काय होता? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, मलिक यांनी केवळ एकच संपत्ती घेतली नाही तर अशा 5 मालमत्ता घेतल्या आहेत ज्यात अंडरवर्ल्डचा संबंध आहे.
माझ्यासाठी सलीम जावेदचा (Salim Javed) सिनेमा नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांना देणार आहे.
हे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही देणार आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री काय कांड करतात हे त्यांनाही माहिती कळू द्या असा टोला त्यांनी लगावला.

 

काय आहे प्रकरण?

 

सरदार शहा वली खान (Sardar Shah Wali Khan) 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. याला सुप्रीम कोर्टानेही शिक्षा सुनावली आहे.
सध्या हा जन्मठेपेच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. मुंबई महापालिका, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange)
याठिकाणी बॉम्ब ठेवण्यासाठी रेकी करण्यासाठी शाहवली खान होता.
टायगर मेमनसोबत (Tiger Memon) ज्या इमारतीत ही बैठक झाली त्या बैठकीला ते हजर होते.
ज्या गाड्यांमध्ये आरडीएक्स (RDX) भरले त्या शाहवली खान होता.

 

दुसरा आरोपी मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल (Mohammad Salim Ishaq Patel alias Salim Patel) याला 2007 मध्ये पकडण्यात आले होते.
सलीम पटेल हा हसीना पारकरचा (Hasina Parkar) ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड होता. हसीना पारकरला ज्यावेळी अटक झाली तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली.
दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकच्या नावानं संपत्ती जमा होत होती. जमिनीवर कब्जा करण्याचा जो धंदा चालत होता त्यात हसीना पारकरचा साथीदार सलीम पारकर होता.

 

कुर्ला येथे गोवावाला कंपाऊंड एलबीएस रोडवर ही जमीन आहे. सलीम पटेल आणि शहा वली खान यांच्याकडून मलिकांच्या कुटुंबीयांनी जमीन घेतली होती.
फराज मलिक (Faraz Malik) यांनी ही जमीन खरेदी केली होती. या दोघांनी सॉलिडस इन्वेस्टमेंट कंपनीला विकली होती.
1 कोटी महिना या दराने ही जागा भाड्याने दिली आहे. 2005 ही अवघ्या 30 लाखात जमीन खरेदी केली.
बाजारभावापेक्षा कमी दरात ही जमीन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून घेतली.
कवडीमोल दरात ही जमीन खरेदी करण्यामागे काय हेतू होता.? असा सवाल फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारला आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | ncp leader nawab malik links underworld he purchased land convicts case bjp leader devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RR Patil | ‘मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?’ आबांच्या कन्येची भावनिक पोस्ट व्हायरल

Tulsi Water Benefits | हिवाळ्यात पाण्यात टाकून प्या ‘ही’ वनस्पती, अनेक आजार राहतील दूर; होतील अनेक फायदे

Solapur Crime | डोक्यात घाव घालून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून, सोलापूरच्या करमाळा तालुक्यात प्रचंड खळबळ