Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित पवार तडफदार उपमुख्यमंत्री, त्यांच्या येण्याने कामाचा वेग वाढला; फडणवीसांकडून कौतुक (व्हिडीओ)

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Ajit Pawar | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (Ajit Pawar) तडफदार उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी (Jejuri) येथे सोमवारी (दि.7) शासन आपल्या दारी (Shashan Aplya Dari) हा कार्यक्रम पार पडला. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तडफदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येण्याने आमच्या सरकारच्या कामाचा वेग कमालीचा वाढला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Ajit Pawar)

पुण्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde),उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil), सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), उपसभापती नीलम गोऱ्हे ( Dr Neelam Gorhe), आमदार (MLA), खासदार (MP) उपस्थितीत होते. (Devendra Fadnavis On Ajit Pawar)

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, लवकरच लोकांना कार्ड मिळणार आहेत. ती घेऊन दवाखान्यात गेलं की एक रुपया देखील उपचाराचा खर्च येणार नाही. पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदर एअरपोर्ट (Purandar Airport) शिवाय विकास होणार नाही. त्यामुळे कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता काम केले पाहिजे. मी काही पुण्यात निवडणूक लढवायला येणार नाही मी नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहे. मात्र, पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदरला एअरपोर्ट झालं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. (Jejuri Fort Development Plan)

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील मोठ्या महापालिकांचं सांडपाणी प्रक्रिया करुन उद्योगाला देण्याचा विचार सुरु आहे.
असं केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे.
बचत झालेलं पाणी पुण्यात सिंचनासाठी देणं शक्य असल्याचे फडणवीस म्हणाले.
सगळ्यात मोठ एक्सपोर्ट मार्केट एअरपोर्टच्या माध्यमातून शेतीकरीता सुरु होऊ शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही उपयोगाचं असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न सरकार करेल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jejuri Fort Development Plan | जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन