Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, देवेंद्र फडणवीस म्हणाले -‘जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर…’ (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आरक्षणाबाबत मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालून जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्या सोबत आहे. जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांसोबत असणाऱ्यांनी त्यांच्यासोबत त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1718563346385936716?s=20

पुणे-मुंबई दोन्ही शहरं महत्त्वाची

यावेळी केरळमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai News) आणि पुणे शहराला (Pune News) अलर्ट देण्यात आला आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आपण नेहमीच अलर्टवर असतो.
वेगळा कुठलाही अलर्ट दिलेला नाही. आपण निश्चितपणे लक्ष ठेऊन आहोत.
जे काही केरळमध्ये घडलेलं आहे, त्याची सगळी माहिती आपल्या पर्यंत पोहोचेल.
परंतु मुंबई सारखं अत्यंत महत्त्वाचं शहर आणि पुण्यासारखं अतिशय महत्त्वाचं शहर आपल्या राज्यात आहे.
त्यामुळे दोन्ही ठिकाणी निश्चितपणे लक्ष ठेवावे लागते, असेही फडणवीस म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; केलं महत्त्वाचं आवाहन