Devendra Fadnavis On MNS | ”मनसे-भाजपा यांच्यात फारसं अंतर नाही”, संभाव्य युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

नागपूर : Devendra Fadnavis On MNS | मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतली आहे ती आमच्या विचारांशी विसंगत नाही. क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांबद्दल बोलणे हे योग्यच आहे. मराठी माणसाच्या हक्कासोबत त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यामुळे मनसे-भाजपा यांच्यात फारसं अंतर राहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-मनसे संभाव्य युतीवर दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाकी निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही. जे काही आहे चर्चेवर होईल. योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात.

महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिल्लीत बैठक सकारात्मक झाली आहे.
एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील असे नाही. परंतु ८० टक्के काम कालच्या बैठकीत झाले आहे. २० टक्के काम सुरू आहे.
तेदेखील फोनवरून होत आहे. लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल.

दरम्यान, आज बोलताना फडणवीस यांनी मनसे-भाजपा युतीवर स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्याच प्रमाणे राज ठाकरे यांनी देखील आज नाशिकमध्ये बोलताना, निवडणुकीचे काय निर्णय घ्यायचे हे लवकरच सांगेन,
तोपर्यंत संयम ठेवा असे म्हणत युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On BJP | राज ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल, ”मोदींनी येऊन फुलं वाहिली, त्या अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?”

Police Inspector Suicide | पुणे सीआयडीमधील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रेल्वे रुळावर संपवलं जीवन

Pune News | बंगळुरुतील कॅफे बॉम्बस्फोटातील दहशतवादी पुण्यात असल्याचा NIA ला संशय, पथकाकडून तपास सुरु

Khadakwasla Crime | तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हवेली पोलिसांनी आवळल्या मुसक्या (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime | सराईत वाहन चोराला भोसरी पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त