Devendra Fadnavis On Navneet Rana | नवनीत राणांना कारागृहात दिलेल्या वागणुकीबाबत फडणवीसांनी केला धक्कादायक उलगडा; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Mahavikas Aaghadi | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना भायखळामध्ये (Byculla) महिलांच्या कारागृहात तर रवी राणा यांंना तळोजा कारागृहात (Taloja Jail) ठेवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Navneet Rana)  यांनी नवनीत राणा यांना कारागृहामध्ये हीन वागणूक देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

 

नवनीत राणा यांना कारागृहामध्ये अतिशय हीन वागणूक देण्यात आली आहे. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत यांची त्यांना जाण करून देण्यात आली. त्यांना प्यायला पाणीसुद्धा देण्यात आलं नाही त्यासोबतच एक महिला असतानाही त्यांना प्रसाधनगृहात जाऊ दिलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Navneet Rana) यांनी सांगितलं.

 

किती द्वेष करायचा?, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानमध्ये (Pakistan) म्हणायची का?, मुळात हा राजद्रोह (Treason) कसा होऊ शकतो?, जर हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा वाचू लावा आमच्यावर राजद्रोह, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) आव्हान दिलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हल्ला होतो हे गंभीर आहे.
मी स्वत: याबाबत केंद्रीय गृहसचिवांना (Central Home Secretary) पत्र लिहिलं असून
ते दखल घेतील असा मला विश्वास असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Navneet Rana | BJP leader devendra fadnavis criticized thackeray government over attack on kirit somaiya and rana couple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा