Devendra Fadnavis On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंचा ‘गुरुजी’ म्हणून उल्लेख ! सभागृहात गोंधळ; फडणवीस म्हणाले – ‘संभाजी भिडेंचे कार्य चांगले, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Sambhaji Bhide | पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2023) तिसरा आठवडा असून आज सभागृहामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरून (Controversial Statement Of Sambhaji Bhide) गोंधळ निर्माण झाला. संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले. यावेळी त्यांनी भिडे यांच्या आवाजाचे नमुने घेतली जातील असे सांगितले. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. तर वीर सावरकरांबाबत (Veer Savarkar) काँग्रेसच्या मुखपत्रात आक्षेपार्ह लिखाणावरुनही गुन्हा (FIR) दाखल केला जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं. यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी (Congress MLA) सभागृहात घोषणाबाजी करून निदर्शन करत संभाजी भिडे यांचा निषेध केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. (Devendra Fadnavis On Sambhaji Bhide)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले. ते म्हणाले, संभाजी भिडे यांनी अमरावतीत एक भाषण केलं, त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यातील आशयावरुन त्यांनी काही कमेंट केल्या आहेत. तीन दोन पुस्तके डॉ. एसके नारायणाचार्य (Dr. SK Narayanacharya) आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते असल्याचं म्हणणं आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यांनी वाचला. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) गुन्हा दाखल केला आहे. भिडे गुरुजी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भिडे गुरुजी म्हणाल्याने गोंधळ सुरु झाला. तेव्हा त्यांचे नाव गुरुजी आहे, आम्हाल गुरुजी वाटतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Sambhaji Bhide)

संभाजी भिडेंना CRPC नुसार नोटीस

संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस (CRPC Notice) पाठवण्यात आली आहे.
अमरावती पोलिसांनी (Amravati Police) संपर्क साधून नोटीस बजावली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावती येथील सभेचे व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. माध्यमात फिरणारे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यामुळे त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले जातील. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केलेली तक्रार ठाणे पोलिसांकडून अमरावती पोलिसांकडे वर्ग केली आहे. आव्हाड यांनी दिलेल्या संदर्भाचा तपास केला जात असल्याचे फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

संभाजी भिंडेंचे कार्य चांगले, पण…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, कोणत्याही राष्ट्रीय नेत्यासंदर्भात कोणीही
अवमानजनक वक्तव्य केलं तर त्याच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल.
संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी (Hindutva) काम करतात.
ते छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj),
त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात. त्यांचे कार्य चांगले आहे.
पण तरीही त्यांना महापुरुषांवर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही.
त्यांनाच काय कोणालाही असा अधिकार दिलेला नाही.
महापुरुषांवर असं वक्तव्य करेल त्याच्यावर कारवाई होईल.

‘शिदोरी’वर गुन्हा दाखल करणार

वीर सावरकर यांच्यावर देखील आक्षेपार्ह लिखाण केलं जातंय.
काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर माफीवीर असल्याचं,
समलैंगिक असल्याचं लिहिलं गेलं. ज्या प्रमाणे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची कारवाई केली जाईल.
त्याच प्रमाणे वीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’
वर सुद्धा याठिकाणी निश्चितच गुन्हा दाखल केला जाईल, असं देवेंद्र फणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | विक्रांत देवकुळे व त्याच्या इतर 5 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 41 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA