Pune Police MCOCA Action | विक्रांत देवकुळे व त्याच्या इतर 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 41 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | झोमॅटो कंपनीच्या (Zomato Company) डिलिव्हरी बॉयला शस्त्राचा धाक दाखवून पैसे लुटणाऱ्या आणि परिसरातील दुचाकी व तीनचाकी गाड्यावर धारदार शस्त्राने मारुन, तोडफोड (Vehicles Vandalism) करुन विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या विक्रांत उर्फ सरडा देवकुळे व त्याच्या इतर 5 साथीदारावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 41 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

टोळी प्रमुख विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे Vikrant alias Sarada Prakash Devkule (वय-20 रा. दुर्गामाता मंदीर, बोपखेल, पुणे), कुणाल उर्फ साहील बाबु पेरुमलट (वय-21 रा. शांतीनगर, येरवडा), रोहीत शैलेश सदाकळे (वय-21 रा. येरवडा), गणेश बाबु बावधने (वय-20 रा. पडाळे वस्ती, औंध रोड, खडकी), आदित्य भारती शेडगे (वय-20 रा. पिंपळे गुरव), तेजस उर्प बलमा अर्जुन गायकवाड (वय-20 रा. जुनी सांगवी पुणे) यांना अटक (Arrest) करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का कारवाई (Pune Police MCOCA Action) करण्यात आली आहे. आरोपींवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) आयपीसी 395, 397, 392, 341, 427 आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 जुलै रोजी विश्रांतवाडी येथील चव्हाण चाळ जवळ घडला होता.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना विक्रांत उर्फ सरडा देवकुळे याने नव्याने टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील चार वर्षापासून गुन्हे करत आहे. या टोळीवर विनापरवाना शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, पोलीस कायदा व सुव्यवस्थेच्या (Police Law and Order) आदेशाचा भंग करणे, तसेच विश्रांतवाडी भागात आपले टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी व दहशत राहावी यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

टोळी प्रमुखावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात
दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा
1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Senior PI Dattatraya Bhapkar) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना प्रस्ताव सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे (Yerwada Division) सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे (PI Bhalchandra Dhawale),
सर्व्हेलन्स पथकाकडील पोलीस अंमलदार मनोज शिंदे व सुनिल हसबे यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tamanna Bhatia | रजनीकांत व तमन्ना यांच्यातील वयाच्या अंतरामुळे ते कसे करु शकतात एकत्र काम?,
यावर तमन्नाने दिले चोख उत्तर