Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रतिक्रिया, ”इतक्या ज्येष्ठ नेत्याने आमदारांना धमकी देणे योग्य नाही”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Sharad Pawar | शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ५५ वर्षे त्यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याने सुनील शेळके (MLA Sunil Shelke) या आमदारांना धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी शरद पवारांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. पण त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते आज कुठल्या स्तराला आहेत. अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या देऊ लागले तर त्यांचा स्तर खाली येईल. मला वाटत नाही की कुणी आमदार शरद पवारांना धमकी देईल. मी काही त्यांचे म्हणणे ऐकलेले नाही, तुम्ही जे सांगत आहात त्यावर मी इतकीच प्रतिक्रिया देतो आहे की असे त्यांनी बोलणे योग्य नाही.

नेमके काय आहे प्रकरण…

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी स्थानिक आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला. शरद पवार म्हणाले, मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आले की, इथल्या काही लोकांनी आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली.

कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचे नाही का? कोणी बोलले तर दमदाटी होते.

आमदार सुनील शेळके यांना सुनावताना शरद पवार म्हणाले, इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवते का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आले होते ते आठवते का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता?

ते पुढे म्हणाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचे चिन्ह लागते, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिले? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकत्र्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस.

माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असे काही केले तर शरद पवार म्हणतात मला, असा इशारा शरद पवार यांनी आमदार शेळके यांना दिला.

दरम्यान, आता हे प्रकरण तापत चालले असून आमदार शेळके यांनीही शरद पवार यांना आव्हान दिले आहे. मी दमदाटी केली असेल तर एकतरी पुरावा द्या, अन्यथा मी महाराष्ट्रभर फिरून शरद पवार मला धमकावतात, असे सांगेन, असे शेळके यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे जिल्हयातील हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट रात्री 12.30 ला बंद करा, निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचा आदेश

सन 2024- 25 या वर्षीचे पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर; समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रूपयांची भरवी तरतूद

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi Meeting | मविआची बैठक सकारात्मक, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर हास्य! पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय

Indrani Balan Foundation | भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान (Video)

माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍यांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

MP Supriya Sule | संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने, म्हणाल्या ”हे सगळे बहिणीसाठी….”