PMC On Pune Hawkers | पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर

प्रमाणपत्र विक्री केल्याचे आढळल्यास ते रद्द करण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC On Pune Hawkers | महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) पथारी व्यावसायीकांना देण्यात येणारे ‘फेरीवाला प्रमाणपत्र ’ काही विक्रेते इतर नागरिक अथवा व्यावसायीकांना आर्थिक व्यवहार करून विकत आहेत. फेरीवाला प्रमाणपत्राची विक्री बेकायदेशीर असून ती नियमानुसार बाद ठरणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुठल्याही विक्रेत्याने अथवा नागरिकांने प्रमाणपत्रांचा व्यवहार करू नये, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी केले आहे.

महापालिकेच्यावतीने पथारी व्यावसायीकांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. परंतू काही व्यावसायीक हे प्रमाणपत्र आर्थिक व्यवहार करून अन्य व्यावसायीक अथवा नागरिकांना विकत असल्याचे पाहाणीत आढळून आले आहे. प्रमाणपत्र ज्याच्या नावे आहे, त्यालाच व्यावसाय करण्याची परवानगी आहे. ते प्रमाणपत्र अन्य कोणी वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास बाद केले जाणार आहे. त्यामुळे ते विकत घेणार्‍याचे नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाची कुठलिच जबाबदारी राहाणार नाही. त्यामुळे नोंदणीकृत व्यावसायीकांनी त्यांचे प्रमाणपत्र अन्य कोणालाही देउ नये, असे आवाहन माधव जगताप यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi Meeting | मविआची बैठक सकारात्मक, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर हास्य! पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय

Indrani Balan Foundation | भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान (Video)

माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍यांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

MP Supriya Sule | संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने, म्हणाल्या ”हे सगळे बहिणीसाठी….”

Amit Shah On Sharad Pawar | अमित शहांचे टीकास्त्र, अवघा महाराष्ट्र ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय, त्या…